पुणे - चुलत आजोबांचा अंत्यविधी आटोपून पुणे कॅम्प येथील आॅफिसला जाण्यासाठी दुचाकीवरुन जाताना युवतीची पर्स रस्त्यावर पडली. परंतू, आॅफिसला जाण्याच्या गडबडीत त्यांना समजले नाही. आॅफिसला गेल्यावर त्यांना पर्स हरवल्याचे व त्यामधे काही रक्कम, मोबाईल फोन, महत्वाची बँकेची कार्ड व काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले. तेव्हा अनिल मोरे या गृहस्थांना पर्स सापडली. त्यांनी ती पोलिसांकडे सूपुर्द केली. युवतीने अनिल मोरे यांच्या माणुसकीचे व पोलिसांनी तत्परतेने केलेल्या सहकार्याचे आभार मानले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या दुचाकीवरुन जाताना दुःखद घटनेमुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. पुढे डेक्कन कडून नदीपात्रातून जात असताना त्यांची पर्स रस्त्यावर पडली. परंतू, आॅफिसला जाण्याच्या गडबडीत त्यांना समजले नाही. आॅफिसला गेल्यावर त्यांना पर्स हरवल्याचे व त्यामधे काही रक्कम, मोबाईल फोन, महत्वाची बँकेची कार्ड व काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडाने आॅफिस बाहेर येऊन आले त्या दिशेने शोध घेत जायचे ठरवले. फरासखाना येथे आलेले अनिल मोरे यांच्याकडून पर्स घेऊन गंधाली यांच्या ताब्यात दिली. पर्समधे सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करुन एका तासातच त्यांना पर्स परत मिळाली याचा आनंद झाला. नशीब चांगले म्हणून समर्थ पोलिस ठाणे हद्दीतील वाहतूक पोलिस विठ्ठल छल्लारे यांची भेट समर्थ पोलिस ठाण्याजवळ झाली व गंधाली यांनी घाबरतच झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. लगेचच समर्थ पोलिस ठाणे येथे कार्यरत पोलीस सचिन जाधव यांनी गहाळ झालेल्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा अनिल मोरे हे गृहस्थ यांनी पर्स मला सापडली असून मी फोनची वाटच पाहत होतो असे सांगितले. अखेर पोलिस शिपाई जाधव यांनी गंधाली यांच्या बरोबर जाऊन फरासखाना येथे आलेले अनिल मोरे यांच्याकडून पर्स घेऊन गंधाली यांच्या ताब्यात दिली. पर्समधे सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करुन एका तासातच त्यांना पर्स परत मिळाली याचा आनंद झाला.
अंत्यविधी आटोपून आॅफिसला निघालेल्या युवतीची हरवलेली पर्स परत मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 9:57 PM
कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या दुचाकीवरुन जाताना दुःखद घटनेमुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. पुढे डेक्कन कडून नदीपात्रातून जात असताना त्यांची पर्स रस्त्यावर पडली.
ठळक मुद्देपोलिसांची तत्परता व सामान्य नागरिकाचा प्रामाणिकपणा; युवतीने मानले आभार