पुणे : पुण्यासह सर्वत्रच महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र याच महिला दिनी पुण्यातील चुडामान तालीम, हरकानगर, भवानी पेठ यांसारख्या भागातील पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर महिलांना रस्त्यावर उतरावे लागले. तब्बल काही तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
पुणे महापालिकेच्या स्वारगेट पाणीपुरवठा विभागामार्फत गेल्या अनेक महिन्यांपासून चुडामान तालीम , हरकानगर, भवानी पेठ या भागातील नागरिकांना बंद किंवा अपुऱ्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. प्रशासनाकडे पाण्याच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी विनंती करून देखील तोडगा निघत नसल्याने आज या भागातील संतप्त महिलांनी चुडामान तालीम, चौक, भवानी पेठ येथे अचानक रस्ता जाम करत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे भवानी पेठ ते पुलगेत या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे भवानी पेठ ते पुलगेत या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळाली.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना देखील शहरातील काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.तसेच अद्याप उन्हाळ्याची तीव्रता बाकी जाणवत नसताना ही समस्या उद्भवल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.