शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

प्रसूती रजांवर गदा आणणाऱ्या ‘बार्टी’बद्दल महिलांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:51 AM

‘लोकमत’च्या बातमीची चर्चा; आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) महिलांना प्रसूती रजेच्या अधिकारालाच हरताळ फासण्यात आल्याचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर दिवसभर बार्टीत ‘लोकमत’चीच चर्चा होती. विशेष म्हणजे, प्रसूती रजेचा मूलभूत अधिकार नाकारणाºया आणि स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाला तिलांजली देणाºया या प्रशासनाचा विविध स्तरातून निषेध करण्यात आला.बार्टीमध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी साधारण ७२ टक्के महिला कर्मचारी काम करतात. असे असताना महिलेचा माता होण्याचा मूलभूत अधिकार नाकारून तिला कामावरच न घेण्याबाबत मनुष्यबळ पुरवणाºया कंपनीला पत्र देणाºया महासंचालक आणि निबंधक यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचे अनेकांनी दूरध्वनी करून सांगितले.एका महिला कर्मचाºयाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशननुसार न्यायालयाने १९ आॅक्टोबर २०१८ रोजी एक निकाल दिला असून, प्रसूती रजेच्या काळातील वेतन देण्याचा आदेश बार्टीला दिला होता. त्यानुसार १३ जून २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीतील वेतन निकाल लागल्याच्या तारखेपासून एक महिन्यात देण्याचे आदेश बार्टीच्या महासंचालकांना देण्यात आले होते. या निर्णयाचा आधार घेऊन काही महिलांनी निबंधक यादव गायकवाड यांच्याकडे प्रसूती रजा काळातील वेतन मिळण्याबाबत आणि कामावर रुजू करून घेण्याबाबत अर्ज दिला होता. मात्र, चालढकल केली जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.आणखी एक प्रकरण समोर आले असून, विधी विभागात काम करणाºया काही महिलांनी देखील अर्ज दिला होता. मात्र, त्यांना उच्च न्यायालयाच्या या आदेशाची कॉपी आम्हाला चालणार नाही. तुम्ही तुमचे वेगळे प्रकरण न्यायालयात दाखल करा. न्यायालयाने असाच आदेश पुन्हा दिला तर आम्ही विचार करू, असे सांगण्यात आल्याचे एका महिलेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी