शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 9:21 PM

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  

 

किरण उंद्रे  :

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  पतीच्या टेम्पोला अपघात झाला. अपघातमध्ये पतीच्या पायाला दुखापत होऊन पायात रॉड टाकायला लागला. मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जन्माचे अपंगत्व आले. हालचालीवर मर्यादा आल्या. त्यामुळे पूर्वीसारखं काम जमेना. अशा परिस्थित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली. 

 सरिता गाडे यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. हहडपसर, मांजरी,  पंधरा नंबर, महादेवनगर व इतर परिसरात सध्या रिक्षा चालवत आहेत.त्या बोलताना पुढे म्हणाल्या वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या समस्येला अनेक नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून खचून जावून अनेकण आत्महत्या करतात. माझे पती बाळु गाडे हे देखील रिक्षा चालवत होते. कुटुंबाला मदत करण्यासाठी मी देखील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा ओढते.

सरिता गाडे सध्या भाड्याने परमिट लायसन्स घेऊन सध्या रिक्षा चालवत आहेत. ते म्हणाले माझे परमिट लायसन्स काढायचे आहे परंतु कागदपत्रांमध्ये त्रुटी निघत असल्याने माझे परमिट लायसन्स निघत नाही. त्यामुळे दुसºयाचे परमिट लायसन्स वापरत आहेत. त्यामुळे ज्या मालकाच्या नावे लायसन्स आहे त्यांना दिवसाला दोनशे पन्नास रुपये भाडे स्वरूपात पैसे द्यावे लागतात. त्यामुळे स्वत: चे परमिट लायसन्स निघाल्यास हे पैसे द्यावे लागणार नाही. शासनाने महीलांना परमिट लायसन्स काढण्यासाठी सवलत दिली पाहिजे अशी गाडे यांनी मागणी केली आहे. 

सुरवातीला रिक्षा चालवना थोडे अवघड वाटत होते पतींनीच रिक्षा चालवायला शिकवले परंतु सध्या काही वाटत नाही. उलट प्रवाशांना महिला रिक्षा चालवत असल्याचे कुतूहल वाटत आहे. प्रवाशी रिक्षात बसल्यावर माझी विचारपूस करतात. पंरतु कुटुंबाला हातभार लावत असल्याने समाधान वाटते. अनेक महाविद्यालयीन मुली माझ्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतात. यातून प्रवाशांमधील असणारी आपुलकी दिसून येत.

बाळू गाडे (महिला रिक्षाचालकाचे पती) : १९९२ साली उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात आलो. व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात २०१४ साली अपघात झाला.  त्यात पायाला मोठी दुखापत झाली. पाय काम करत नाही. त्याचबरोबर कंबरेचा मनक्याचा आजार असल्याने रिक्षा चालवताना त्रास होतो. पत्नीनेच स्वत: रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.  स्वत: म्हणाली कुटुंब चालवण्यासाठी माझा हातभार लागेल. त्यामुळे तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

टॅग्स :Womenमहिलाauto rickshawऑटो रिक्षा