राजगुरुनगर: खेड पंचायत समितीच्या आवारातील जागेत महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ, ग्रामीण भागातील कडधान्य, विविध हस्तकलेच्या वस्तुंना आता हक्काची जागा मिळाली आहे
जागतिक महिला दिनानिमित्ताने खेड तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांनी आत्मनिर्भर होत आपल्या कलाकौशल्याने तयार केलेल्या वस्तुसह विविध धान्य पँकिंग करुन आता बाजारात आणण्यासाठी हक्काची जागा घेऊन विक्रीकेंद्र सुरु केले आहे.
शहरातील नागरीकांबरोबरच तालुकाभरातून पंचायत समितीत कामानिमित्त येणा-या जनतेला आता महिलांनी सुरु केलेले विक्री केंद्र मध्यवर्ती ठिकाण होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नोत्ती अभियानाच्या माध्यमातून महासम्रूध्दी सक्षमीकरण अभियानातंर्गत खेड तालुक्यातील महिला बचत गटांसाठी सुरु करण्यात आलेल्या विक्री केंद्राचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर उपसभापती चांगदेव शिवेकर आदींसह जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट ,पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे,सुनिता सांडभोर, नंदाताई सुकाळे, मंच्छीद्र गावडे,अंकुश राक्षे, अरुण चौधरी गटविकास अधिकारी अजय जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे ,सुधीर साळवी आदिच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिकासह विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या साहित्याचे उत्पादक ४५ महिला बचत गटातील महिलांसह अध्यक्षा उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन पंचायत विस्तार अधिकारी सुखदेव सांळुखे, सांख्यिकी विस्तार अधिकारी अनिता ससाणे ,तालुका व्यवस्थापिका लता केंगले यांनी केले.
फोटो ओळ.: राजगुरूनगर येथील पंचायत समिती आवारात तालुक्यातील महिला बचत गटासाठी सुरु करण्यात आलेल्या विक्री केंद्राचा शुभांरभ करण्यात आला.