पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे ग्रामदैवत सोमश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये कारेगाव रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या सदस्या स्वाती पाचुंदकर तसेच हरिता ग्रामर कंपनी फाउंडेशनच्या ग्रामविकास अधिकारी उषा थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी आदर्श सरपंच गायत्री चिखले, मनीषा खेडकर विद्यमान ग्रा. पं. सदस्या मनीषा चिखले, निकिता खेडकर, जयश्री सोनवणे, अनिता बडदे, मणिक म्हाळसकर, महेंद्र डोळस, शरद खळदकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय खेडकर, संदीप सोनवणे, अरुण कळसकर, अर्चना खळदकर, कल्पना खळदकर, वर्षा पांचुदकर, आशा शेलार, जया गायकवाड, ग्रामसेविका स्वाती टाकळकर तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांना जि. प. सदस्या स्वाती पाचुंदकर आणि पंचायत समतीचे अधिकारी अनिल नरके यांनी मार्गदर्शन करतांना प्रत्येक बचत गटाला १५ हजार रुपये अनुदान असल्याचे सांगितले. स्वाती पांचुदकर यांच्या वतीने महिलांना हळदीकंकू वाण देवून गृहोपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. कारेगाव रांजणगाव गणपती गटातील कान्हूरमेसाई, बुरुंजवाडी, पिंपळे खालसा, कोंढापुरी यासह विविध गावातही हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी गावातील महिलांसह आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांचा स्वाती पांचुदकर यांनी विशेष सन्मान केला. सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले तर गायत्री चिखले यांनी आभार मानले.
पिंपरी दुमाला येथे महिलांना मार्गदर्शन करताना जि. प. सदस्या स्वाती पांचुदकर.