महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिजाऊ बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शनप्रसंगी त्या बोलत होत्या.
शीतल मोरे म्हणाल्या, महिला चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित होत्या. सध्याच्या परिस्थितीत महिला घराचा उंबरठा ओलांडून स्वकर्तृत्वातून स्वावलंबी झाल्या आहेत. महिला स्वावलंबी झाल्या असल्या तरी काही प्रमाणात त्या निर्भर मात्र झाल्या नाही ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. महिला निर्भर नसल्याने अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे.
अन्यायग्रस्त महिलांनी कायद्याच्या दृष्टिकोनातून अन्यायाचा बीमोड करणे काळाची गरज आहे. याकामी सुरक्षा समितीच्या माध्यमातून पोलिसांनी महिलांना पाठबळ देणे गरजेचे आहे . कौटुंबिक दृष्टिकोनातून महिला पुरुषांच्या बरोबरीने कामकाज करु लागल्या आहे. परिणामी पुरुष आणि महिला समसमान आहे असे सुञ बाळगल्यास महिलांना देखील कौटुंबिक दृष्टिकोनातून न्याय मिळाल्या शिवाय राहणार नाही. कौटुंबिकदृष्ट्या वावरत असतांना सासू कधी सून होती आणि सून कधीतरी सासू होणार आहे हे सूत्र सासू सुनेने संयुक्तरीत्या अवलंबवले तर कौटुंबिक छळ, हुंडाबळी यांसह महिलांवरील अन्य अन्यायाचे प्रकार थांबतील, असेही ॲड. शीतल मोरे म्हणाल्या.
१२ दौंड मोरे