पुणे : वटपोर्णिमेच्या निमित्ताने दागिने घालून वडाची पुजा करण्यासाठी बाहेर पडलेल्या सुवासिनींना सोनसाखळी चोरट्यांनी आपला हिसका दाखविला़. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी १३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या़ असून त्यात काही लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला़. पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासून नटून थटून तयारी करून, हातात पूजा साहित्याचे ताट घेऊन आपापल्या परिसरातील वटवृक्षाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांवर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून चोरुन नेल्या. वटपोर्णिमाच्या दिवशी गेल्या वर्षी १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते़ हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने बंदोबस्त लावला होता़. परंतु, या बंदोबस्ताचा फज्जा उडवत चोरट्याने शहरभर धुमाकूळ माजविला़. वटपोर्णिमेनिमित्त सुवासिनी वडाच्या पुजेसाठी ताट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले़. लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ८़१० मिनिटांनी पहिली सोनसाखळी चोरीची घटना घडली़. पाठोपाठ शिवाजीनगरला ८ वाजून २० मिनिटांनी दुसरी घटना घडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली़. पाषाण येथील बालाजी चौक व त्यापासून सुमारे २५० मीटरवर असलेल्या शाही चौकात एकापाठोपाठ दोन सोनसाखळी चोरीत सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला़.सांगवी परिसरात सकाळी ८.४५ वाजता पहिली सोनसाखळी चोरीची घटना घडली. याच परिसरात ८.५५ वाजता दुसरी, ९ वाजता तिसरी आणि सव्वा नऊ वाजता चौथी घटना घडली. एक तासात तब्बल चार घटना घडल्या. या घटना घडल्याचे वृत्त ताजे असताना, ९. २० ला वाकड परिसरात वडाच्या झाडाची पुजा करण्यास गेलेल्या महिलेची अज्ञात चोरट्यांनी सोनसाखळी पळविली. भारती विद्यापीठ परिसरात, चतु:श्रृंगी परिसरात प्रत्येकी २ आणि मार्केटयार्ड कोंढवा, वाकड येथे प्रत्येकी एक सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत़. लष्कर पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या पहिल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेतील चोरट्यांच्या मोटारसायकलचा नंबर पोलिसांना मिळाला आहे़. त्यावरुन हे इराणी तरुण असून त्यांनी काही ठिकाणी एका पाठोपाठ दागिने हिसकावून नेण्याच्या प्रकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे़ किमान दोन ते तीन टोळ्यांनी या चोऱ्या केल्या असण्याची शक्यता आहे़. हा गंभीर प्रकार असल्याने पोलीस अधिकारी घटनेची माहिती मिळताच एका ठिकाणी पोहचत असतानाच त्यांना आणखी काही ठिकाणी दागिने हिसकाविण्याचे प्रकार घडल्याची माहिती मिळत होती़. शहराच्या जवळपास सर्वच भागात हे प्रकार झाल्याने शहर पोलिसांच्या बंदोबस्ताचे वाभाडे निघाले आहेत़. याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी सांगितले की, या सर्व घटना प्रामुख्याने शहराच्या उपनगरांमध्ये घडल्या असून पोलिसांची जेथे घटना घडली़. त्याच्याजवळचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत़. त्यात मोटारसायकलवरील दोघे जण दिसत असून एकाने काळा तर दुसऱ्याने लाल जॅकेट घातले आहे़. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते़. शहरातील बऱ्याच वेगवेगळ्या भागात या घटना घडल्या असून आता त्यात किती चोरट्यांचा हात हे त्याचे विश्लेषण केल्यानंतर समजू शकेल़ शहरातील नाकाबंदीची विश्लेषण केले जाणार आहे़. चोरट्यांच्या शोधासाठी संपूर्ण पोलीस दल मागावर असून सर्वत्र नाकाबंदी केली जात असून सराईत गुन्हेगार चेक करणे सुरु करण्यात आले आहे़. वटपोर्णिमेच्या दिवशी गेल्यावर्षी १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते़. हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने बंदोबस्त लावला होता़. परंतु, या बंदोबस्ताचा फज्जा उडवत चोरट्याने शहरभर धुमाकूळ माजविला़.
वटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:51 PM
वटपोर्णिमेच्या दिवशी गेल्यावर्षी १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते़. हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने बंदोबस्त लावला होता़. परंतु, या बंदोबस्ताचा फज्जा उडवत चोरट्याने शहरभर धुमाकूळ माजविला़
ठळक मुद्देमहिलांमध्ये भीतीचे वातावरण सुवासिनी वडाच्या पुजेसाठी ताट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी केले़ लक्ष्य काही अंतरावरच एका पाठोपाठ चार घटना