समितीच्या नियमित बैठकाही होतात, अशी माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. पवार यांनी सांगितले, पीडित महिलेसोबत पोलिसांसमोर कोणी महिला सदस्या तिच्यासोबत उभी राहिली तर संवाद साधणे सोपे होते. यामध्ये मानसिक आधारासोबतच समुपदेशनाची भूमिका महत्त्वाची असते. हीच भूमिका महिला सुरक्षा समित्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. महिला सदस्यांना कायद्यांची ओळख असल्याने पीडितेवर योग्य कलम लावले गेले की नाही हे तपासता येते. जबाब तयार करुन केलेल्या पंचनाम्यावर सही करणे, नंतर प्रसंगी कोर्टात साक्ष देण्याचे कामही समितीला करावे लागते. या समितीच्या माध्यमातून संघर्षग्रस्त महिलांना कायदेविषयक सहाय्यता मिळवून देण्याकरिता पोलीसांच्या मध्यस्थीने पूर्ण सहकार्य या ठिकाणी करण्यात येते. या समितीमध्ये महिला वकील, डॉक्टर, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्त्या इत्यादीचा समावेश करण्यात आला आहे.
समितीमध्ये अॅड. मनीषा सांगळे (अध्यक्षा), सदस्य राज्यश्री मेरगळ, नंदा हगारे, दीपाली बोराटे, प्रियंका बनकर, प्रणिता बनसोडे,राज्यश्री खाडे,सुवर्णा निंबाळकर,मंजूषा कुलकर्णी यांचा समावेश आहे.
पोलीस स्टेशनच्या सहकार्याने समितीच्या माध्यमातून ७० टक्के घरगुती हिंसाचार वाद मिटवले गेले आहेत. महिलांना न्याय व आधार देऊन समुपदेशन केले जाते. पीडितांना कायदेविषयक सहायता केली जाते.
.
अॅड. मनीषा सांगळे
अध्यक्षा महिला दक्षता समिती,