याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
फिर्यादी नंदा किसन भारमळ ( वय ४३ ) व पती किसन भारमळ हे वाडारोड येथील गोळी कारखाना येथे शिव कदम बीबी यांचे चाळीत राहण्यास होते.पत्नी नंदा भारमळ ह्या मोलमजुरी चे काम करतात. पती किसन भारमळ हा संगम गार्डन सोसायटी चे सेक्युरिटी काम करत होता. ( दि. ८ मार्च )रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पती किसन भारमळ घरी आला होता. दरम्यान पत्नीची नातेवाईक दिपाली भोईटे घरी आली होती. घरात आलेली मुलगी कोण आहे असे पतीने विचारले असता पत्नीने पतीला येथून निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून पती किसन यांने चाकूने पत्नी नंदा हिच्या पोटावर, हनुवटी डाव्या हाताच्या पोटरीवर व कोपरा जवळ, डाव्या पायाचे मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. व तेथून पळ काढला. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपी किसन भारमळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडी दिली असुन पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल लाड करित आहे.
.