आज महिला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करतांना दिसत आहेत. गिर्यारोहनातही महिलांची कामगिरी उल्लेखनीय दिसून येते. बाचेंद्रि पाल या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले. तुसी दास ही पहिली भारतीय गिर्यारोहक जीणे कंचनगंगा शिखर सर केले. तर कृष्णा पाटील ही पहिली महाराष्ट्रीयन गिर्यारोहक जिने एव्हरेस्ट सर केले. तसेच पहिली भारतीय महिला गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने माउंट मकलू शिखर सर केले. असा महिलांचा गिर्यारोहनातील प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
भविष्यात शहरातील महिला गिर्यारोहक पिंपरी चिंचवड शहराचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात जागतिक पातळीवर पोचवतील असा विश्वास वाटतो. त्यादृष्टीने एव्हरेस्ट व कंचनगंगा सर करणारे गिर्यारोहक, तसेच एकमेव डबल अष्टहजारी शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला गिर्यारोहक सराव करीत आहेत. यावेळी राष्ट्रीय खेळाडू चेलुवी ढोकले हिने गिर्यारोहणाचे प्रात्यक्षिक दाखवले.
राष्ट्रीय खेळाडू श्रेया बधे, आकांक्षा पवार, वैष्णवी गवळी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तर तानीषा पिंगळे रुद्राक्षी मोहिते, ईश्वरी साळे या नवोदित गिर्यारोहकांनी रॅपलिंगचा अनुभव घेतला. गौरव लंघे, हरीश पाटील, ओंकार बुर्डे, अभिषेक सुपे यांनी तांत्रिक मदत पुरवली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद खाडिलकर, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र पवार, संजय बधे, श्री रोकडे यांनी सर्वांचे कौतुक केले. गिर्यारोहण सराव मैदान उभारणी साठी नगरसेवक अजय सायकर, माजी महापौर मंगल कदम, पक्षनेते एकनाथ पवार यांची मोलाची मदत लाभली.
फोटो ओळ : महिला दिनानिमित्त रॅपलिंग करताना महिला गिर्यारोहक.