शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

‘स्वरभास्करा’ला वाहिली रसिकांनी शब्दरूपी सुमनांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 3:02 AM

लेखनातून घडविले पंडितजींच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन

पुणे : भारतीय अभिजात संगीत दरबारातील एक रत्न म्हणजे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी. आजवर पंडितजींच्या व्यक्तिमत्वामधील विभिन्न पैलूंवर शिष्यगणांसह प्रथितयश कलाकारांनी विवेचन केले आहे. मात्र पंडितजींच्या शिष्याकडूनच संगीताचे धडे घेतलेल्या पं. नागराज राव हवालदार यांनी ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी-द व्हॉईस आॅफ पीपल’या इंग्रजी पुस्तकाद्वारे ‘स्वरभास्करा’कर्तृत्वाचे दर्शन घडवित त्यांना ‘शब्दसुमनांजली’ वाहिली आहे.अंगमेहनतीची कामे करून गुरु पं. सवाई गंधर्व यांच्याकडून विद्याध्ययन करणारे शिष्य... घराण्याच्या तालमीतून आपली स्वतंत्र शैली निर्माण करणारे गायक... उत्तम गायक घडविणारे गुरु... पंडितजींची राग सादरीकरणाची पद्धत, त्यावरचे चिंतन, अशा रूपात पंडितजींची सांगीतिक कारकिर्द पुस्तकाद्वारे उलगडली आहे. तब्बल साडेतीन दशकांनंतर पं. भीमसेन जोशी यांच्यावर इंग्रजीमधील दुसरे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. पं. नागराज राव हवालदार यांच्या पाच वर्षांच्या प्रयत्नांतून हे पुस्तक आकाराला आले आहे. नागराज राव हवालदार हे पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. माधव गुडी यांचे शिष्य आहेत.ज्येष्ठ कला समीक्षक मोहन नाडकर्णी यांचे ‘द मॅन अँड हिज म्युझिक’ हे पुस्तक १९८४ मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्या कारकिर्दीचा बहराचा कालखंड सुरू झाला. त्यांच्या व्यक्तित्व व कर्तृत्वाचा वेध घेणारे लेखन इंग्रजीमध्ये झालेले नाही. याच जाणीवेतून ‘आजोबाला नातवाचे अभिवादन’ करण्याच्या उद्देशातून हे लेखन केले असल्याचे नागराज राव हवालदार यांनी सांगितले.वयाच्या पाचव्या वर्षी धारवाड आकाशवाणीवर प्रसारित झालेले ‘संध्या राग’ या कन्नड चित्रपटातील पंडितजींचे गीत ऐकले आणि त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. १९८४ मध्ये त्यांची भेट घेऊन गायन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. मात्र, त्यावेळी पंडितजी यांची कारकिर्द भरामध्ये होती.या पुस्तकामध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या गुरुभगिनी गंगुबाई हनगल, मंगलोर येथील बालमित्र आणि तबलावादक दत्तात्रय गरुड, नाना मुळे, पाश्र्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘अनकही’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल पालेकर, पंडितजींचे शिष्य आणि कुटुंबीय यांनी ‘स्वरभास्करा’च्या सांगितलेल्या आठवणींचा समावेश आहे. याशिवाय पंडितजी रागाची मांडणी कशा प्रकारे करतात, त्यामागची पद्धत, रागांकडे पाहाण्याची दृष्टी यावर देखील प्रकाश टाकण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bhimsen Joshiभीमसेन जोशी