खोर : अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या चौफुला सुपा (ता. दौंड) रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून कामाला सुरुवात झाली आहे. लोकमतने या रस्त्याची दुर्दशा; त्यामुळे प्रवाशांचे विशेषत: अष्टविनायक यात्रेला आलेल्या भाविकांचे हाल, असे वृत्त सातत्याने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन अष्टविनायक महामार्गांसाठी निधी मंजूर करण्यात आला, तरी लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही. लोकमतने त्याचाही पाठपुरावा केल्याने अखेर या रस्त्याचे काम सुरु झाले.
अष्टविनायक राज्यमार्गासाठी राज्यशासनाने तब्बल १५१ कोटीचा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील एक मार्ग चौफुला-सुपा रस्त्याचे होणार आहे. मात्र निधी मंजूर झाल्यानंतर सुध्दा या मार्ग रखडला होता. रस्त्यावरील अर्धा-एक फुटांचे भले मोठे खड्डे आणि उखडलेले डांबरीकरण यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यामुळे अष्टविनायक दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांची वाहनांचा खड्डात गाडी आपटून अपघात होत होते. वाहनांचे नुकसान होऊन प्रचंड आर्थिक हानी झालीच मात्र अनेकांचा जीवसुध्दा गेला आहे.सातारा, बारामती , शिरूर ,अहमदनगर यांना जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असल्याने अवजड वाहनांबरोबर प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. आधीच अतिशय अरुंद रस्ता त्यात वाहनांची मोठी वर्दळ आणि वाढत चाललेले खड्डे यामुळे आठवडयातून किमान दोन-तीन अपघात ठरलेले होते.दोन वर्षांत काम पूर्ण होणारहा राज्य शासनाचा अष्टविनायक प्रकल्प असून यामध्ये जेजुरी ते मोरगाव, मोरगाव ते सुपा, सुपा ते चौफुला, त्यानंतर पाटस ते पडवी फाटा तसेच कुसेगाव ते सुपा, असा हा टप्पा असणार आहे. हा अष्टविनायक राज्य मार्ग राज्य शासनाच्या माध्यमातून चालू असून त्यासाठी १५१ कोटीचा निधी देण्यात आला आहे. या कामासाठी जवळपास दोन वर्षे लागणार असून त्यानंतर येथून पुढे दहा वर्षे संबंधित ठेकेदार या कामाच्या संदर्भात देखभाल करणार आहे. असल्याची माहिती शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संतोष जाधव यांनी दिली.४लोकमतने या रस्त्यावरील अपघातांचे वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले. शिवाय प्रत्येक अपघाताबरोबर येथील रस्त्याचीदुर्दशा छायाचित्रासह प्रकाशित केल्या.४अखेर त्याची दखल घेतया रस्त्याचे कामसुरू झाले.४अष्टविनायक यात्रेसाठी १५१ कोटींचा निधी४दोन वर्षांत होणार सर्व कामे पूर्ण४नगर, सातारा, बारामतीला जोडणारा महत्त्वाचा रस्ता