आळे गावाचे मार्केट यार्ड पासूनचे व आळेफाटा भागातील सांडपाणी कल्याण महामार्ग ओलांडत चौगुले वस्तीमार्गे पुढे जाते. आळेफाटा परिसरात अनेक वर्षांपासून सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न रेंगाळला असल्याने सांडपाणी आळेफाटा, वडगाव आनंद परिसरात उघड्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून मच्छरांचा उपद्रव होत आहे.
या उघड्या गटारीतून वाहणा-या दुर्गंधीयुक्त पाण्याने चौगुलेवस्ती परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौगुले अनेक वर्षांपासून हा प्रश्न ग्रामपंचायत व शासन दरबारी मांडत होते. ग्रामपंचायत सदस्य डी. बी. वाळुंज यांनीही पाठपुरावा केला. अखेर जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी जिल्हा परिषद निधीतून हा प्रश्न मार्गी लावला. या बंदिस्त गटार योजनेसाठी जिल्हा परिषदेने सात लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कामाचे शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, श्याम माळी, सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले, सदस्य डी. बी. वाळुंज, समीर देवकर, वैशाली देवकर, श्रद्धा गडगे, माजी सरपंच प्रदीप देवकर, कैलास वाळुंज, सचिन वाळुंज, सुरेश चौगुले, बाळासाहेब चौगुले, सोमनाथ गडगे, गणेश भुजबळ उपस्थित होते.
२९आळेफाटा
वडगाव आनंद परिसरात चौगुले वस्ती येथे बंदिस्त गटार योजनेचे सुरू असलेले काम.