स्व-रूपवर्धिनीच्या वार्षिक कार्यअहवाल प्रकाशनाच्या
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सहकार्याध्यक्ष विश्वास
कुलकर्णी, सहकार्याध्यक्ष संजय तांबट
भरत अभंग आदी उपस्थित होते.
हिरेमठ म्हणाले,
ज्या समाजात राष्ट्रीय आणि सामाजिक जाणीव जागृत असते. तो समाज कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो. भारतात वेळोवेळी समाजकार्याची जाणीव करून द्यावी लागते. आपण दररोज ईश्वराची पूजा करत असतो. समाजसेवेकडेही पूजेच्या दृष्टीने पाहायला हवे. इच्छाशक्ती जागृत असणाऱ्या व्यक्तीला काही अवघड नसते. त्यामुळे सर्वांनी समाजकार्य करण्यासठी प्रयत्नशील राहावे.
मुंबईतील मडगावकर ट्रस्टच्या वतीने
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पुरस्कार
देण्यात येतो. यंदाही संस्थेच्या वतीने पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पद्माबाई मडगावकर पुरस्कार आदित्य दिवटे आणि गायत्री मोरे, मधुकर मडगावकर पुरस्कार समृद्धी यादव आणि प्रवण पोळ, मुरली गायकवाड, केतन क्यादर यांना प्रदान करण्यात आले.