केडगाव येथील विस्तारित कांदा व डाळिंब साठवण सभागृहाचा भूमिपूजन समारंभ रमेश थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
बाजार समितीचे सभापती शिवाजी वाघोले म्हणाले की, बाजार समितीच्या माध्यमातून केडगाव, दौंड, यवत येथे दिवसेंदिवस विकासकामे चालू आहेत. भविष्यात समितीच्या माध्यमातून पेट्रोलपंप उभारण्याचे नियोजन आहे. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे प्रथमच केडगाव येथील कांदा मार्केट महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य कांदा मार्केट बनले आहे. यावेळी रमेश थोरात यांच्या हस्ते परभणीचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झुंबर गायकवाड, सभापती शिवाजी वाघोले, सागर फडके, संभाजी ताकवणे, दिलीप हंडाळ, भास्कर देवकर, माणिक राऊत, उत्तम ताकवले, महेंद्र शितोळे, सागर शितोळे, संपत निंबाळकर, भगवान आटोळे, राजू जगताप, दत्तात्रय पाचपुते, विशाल शेलार यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
१८ केडगाव
भूमिपूजन करताना रमेश थोरात, उपस्थित मान्यवर.