आळंदी : राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे. बाह्यवळण मार्गासह जोडरस्त्यांचे भूसंपादन रखडल्याने उर्वरित रस्तेविकास कामासाठी शासनाला पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ येणार असल्याची आळंदीत चर्चा होत आहे. यामुळे विलंबाला जबाबदार घटकांवर कारवाईचे संकेत प्रशासनाचे उच्चस्तरीय यंत्रणेने दिले आहे.आळंदीतील वाहतूककोंडी रोखण्यासाठी इंद्रायणी नदीवर साधकाश्रम आणि सिद्धबेट जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने हा पूल वाहतूककोंडी फोडण्यास सज्ज असताना जोडरस्त्याअभावी या पुलावरून रहदारीला प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे होत असलेल्या कामांतून उघड झाले आहे.पुलाचे काम पूर्ण झाले असून पुलावर पथदिवेदेखील बसविण्यात आले आहेत. मात्र, आळंदी-देहू रस्त्यापासून इंद्रायणी नदीवरील पूल जोडणाºया रस्त्याचे भूसंपादन रखडल्याने बाह्यवळण मार्गाच्या विकासात भूसंपादनाचा अडथळा असल्याचे प्रशासनांकडून सांगितले जात आहे. शासनाचे नियोजन विभागाचे येथील कामावर थेट नियंत्रण नसल्याने येथील कामे अर्धवट अवस्थेत असून अजून सुरूच आहेत.मुदत संपल्याने कामास विलंब; मुदतवाढीचा प्रश्न ऐरणीवरयेथील बाह्यवळण मार्गाचे विकासकामाचे कार्यादेश ३ जानेवारी २०१७ रोजी देण्यात आले होते. या कामाची मुदत १२ महिन्यांची होती. २ जानेवारी २०१८ रोजी मुदत संपली. यामुळे बाह्यवळण मार्गाच्या विकासकामाला वाढीव ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, मुदतवाढ देऊनदेखील अजून काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. वाढीव मुदतीतदेखील काम पूर्ण न झाल्याने आता पुन्हा यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, बाह्यवळण मार्गात आळंदीतील अंतर्गत रस्ते विकसित होत आहेत. यासाठी कार्यादेशाप्रमाणे ६ कोटी ५ लाख २९ हजार ६०४ रुपये खर्चाचे बाह्यवळण मार्गाचे काम आहे.यात आळंदी-देहू रस्त्यावरील मोशी-आळंदी रस्त्यापासून ते इंद्रायणी नदीकिनारा, गोपाळपूर पूल ते केळगाव रस्ता ते चाकण रस्त्या या कामाचा समावेश आहे. मात्र, इंद्रायणी नदीवरील गोपाळपूर पूल ते केळगाव रस्ता ते चाकण रस्ता यादरम्यानचा बाह्यवळण मार्ग विकसित होत आहे. यालादेखील काही महिने अजून वेळ लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दोष दायित्व ६० महिन्यांसाठी संबंधित रस्ते विकसित करणाºया ठेकेदार कंपनीकडे आहे.रस्त्याच्या देखभालीसाठी नंतर फारसा खर्च आळंदी नगर परिषदेला करावा लागणार नाही. उर्वरित बाह्यवळणाचे काम वारकरी शिक्षण संस्था- पद्मावती रस्ता- वडगाव रस्ता ते मरकळ रस्ता तसेच मरकळ रस्ता- चºहोली रस्ता- इंद्रायणी नदी ते पुढे पुणे-आळंदी रस्ता यादरम्यान रस्तेविकासाला गती देण्याची गरज भाविक, नागरिकांतून व्यक्त होत आहे. उर्वरित बाह्यवळण मार्गाचे भूसंपादन आणि रस्तेविकास सुरू झाला नसल्याने आळंदीत वाहतूककोंडी अजून काही काळ कायम राहील.जुन्या दगडी पुलाच्या रुंदीकरणासाठी साकडेआळंदी-चाकण मार्गावरील जुना दगडी पूल अरुंद असल्याने त्याच्या रुंदीकरणाची गरज असल्याने वाढीव कामात रुंदीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या संदर्भात आमदार सुरेश गोरे यांनादेखील नागरिकांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे. येथील डुडुळगाव (ता. हवेली), केळगाव चिंबळी (ता. खेड) जोडणाºया पुलाचे काम पूर्ण, मात्र पुलाला जोडरस्त्यांच्या कामाअभावी पूल अनेक वर्षांपासून वापरास बंद तसेच इंद्रायणी नदीत वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे. इंद्रायणी नदीकडील पूर्वकिनारा मात्र रस्तेविकासापासून वंचित राहिला आहे.
आळंदीतील इंद्रायणी नदीवरील पाचवा लक्षवेधी पूल रहदारीच्या प्रतीक्षेत, बाह्यवळण जोडमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:40 AM