इंदापूर : महात्मा गांधी यांच्या आचार-विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजसेवेचे वृत्त कायम अंगीकारले होते. स्वातंत्र्यवीरांना मदत करण्यापासून ते शैक्षणिक संस्थेची उभारणी करण्यापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात ते कार्यरत राहिले. त्यांचे हे कार्य जीवन प्रवासात नेहमी प्रेरणादायी ठरले असल्याचे गौरवउद्धार कर्मयोगीचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा यांनी काढले.
इंदापूर येथील स्वातंत्र्यसेनानी वै. ह.भ.प. नारायणदास रामदास शहा यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री. नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित तसेच श्री. नारायणदास रामदास संगीत विद्यालय, इंदापूर यांच्या संयोजनाने गायन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या वेळी गोकुकदास शहा बोलत होते.
या वेळी लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारायणदास रामदास शहा यांच्या प्रतिमेचे साधेपणाने पूजन, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर इंदापूर शहरातील नागरिक, विविध संस्थांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्हाॅट्सअप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसेनानी वै. ह.भ.प. नारायणदास रामदास शहा यांना अभिवादन केले. यानिमित्ताने श्रीराम गीते, अभंगवाणी किंवा भक्तिगीते व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाइन भव्य गायन स्पर्धा २०२१ च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विजेते पुढीलप्रमाणे : मोठा गट, प्रथम क्रमांक राजेंद्र पांडुरंग घाडगे (बारामती), द्वितीय क्रमांक राजू नामदेव वाघमारे (इंदापूर), तृतीय क्रमांक श्रीमती विद्या सुरेश ढोबळे (नातेपुते), चतुर्थ क्रमांक कोमल प्रकाश कुलकर्णी (पळसदेव) आणि गौरी मल्हारी घाडगे (इंदापूर) ह्यांना नंबर मिळाला आहे.
तर मध्यम गटात प्रथम क्रमांक अंजली सुनील जाधव (इंदापूर), द्वितीय क्रमांक अंकिता गणेश डांगे (इंदापूर) , तृतीय क्रमांक साक्षी विनायक गुरव (इंदापूर) , चतुर्थ क्रमांक शुभदा संतोष चिंचकर व अमृता अमोल भोज (इंदापूर) यांना मिळाला आहे.
त्याचबरोबर लहान गटात प्रथम क्रमांक कु. धनश्री मारुती भोंग (निमगाव केतकी), द्वितीय क्रमांक अर्णव अमोल भोज (इंदापूर) आणि जान्हवी विनायक गुरव (भोडणी), तृतीय क्रमांक वेदांत प्रभाकर झगडे (इंदापूर), चतुर्थ क्रमांक अक्षरा नवनाथ बनकर (वरकुटे) यांना मिळाला आहे.
या वेळी मुख्याध्यापक विकास फलफले, दादासाहेब जावीर, शारदाताई नागपुरे, प्रमोद भंडारी, दिनकर गोसावी, भगवान मोरे, भारत सोमवंशी, ओंकार जौंजाळ या श्री. नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.