शहरातील प्रभाग सातमधील तापकीरनगर व इंद्रायणीनगर परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली आहे. नागरिकांच्या मदतीने नगरसेवक गिलबिले यांनी वृक्षसंवर्धन केले असून, प्रभागातील ही झाडे आता दहा-पंधरा फूट उंच वाढली आहेत. तापकीरनगर व इंद्रायणीनगरमधील रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उत्साह वाढलेल्या परिसरातील नागरिकांनी इंद्रायणीनगरमध्ये प्रवेश करताना नवीन पुलाजवळ कमान उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे ३० फूट रुंद व २० फूट उंचीची ही स्वागत कमान आहे. प्रभागात पन्नास लक्ष रुपये खर्च करून जॅागिंग ट्रॅक साकारण्यात येणार असल्याचे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले.
०२ आळंदी कमान
आळंदीत इंद्रायणीनगर येथे उभारण्यात येत असलेली स्वागत कमान.