बारामती - बारामती नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांनी थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. १२) कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सकाळी ६ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे नगरपालिका हद्दवाढीसह विविध ठिकाणी काम बंद आंदोलनाचा परिणाम झाला. या भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या पोहोचू शकल्या नाहीत.कामगांराना तीन महिन्याचा पगार दिला नाही. कामगारांचे ठेकेदाराकडे ठेवलेले बँकेचे पुस्तक, एटीएम कार्ड, पासबुक ठेकेदाराकडून परत मिळावे, कामगारास मिळणारा पगार जुन्या खात्यावर जमा व्हावा, कामगार कायदे , किमान घरभाडे भत्ता, बोनस प्रदान, वेतन प्रदान अधिनियम, व ओव्हर टाईम सर्व बाबींचे कायदेशीर बाबीनुसार पालन व्हावे. ठेकेदाराकडून कामगारांना सुविधा वेळेत मिळाव्यात, पगार वेळेवर व्हावा, चारचाकी वाहनांवरील व टँकर चालक, घरी बसविलेल्या कामगारांना कामावर घ्यावे. त्यांंच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यावर २५०० ते ५००० रूपये जमा झाले आहेत. याची चौकशी करावी आदी मागण्या नगरपरीषद प्रशासनाकडे केल्या आहेत. याबाबत आरोग्य निरीक्षक रविंद्र सोनवणे, राजेंद्र सोनवणे यांनी या कामगारांशीसमन्वय साधून त्यांना नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या दालनात चर्चेसाठी नेले.यावेळी चर्चेमध्ये विरोधी नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, भाजप नेते प्रशांत सातव, अजित साळुंके यांनी कामगारांच्या वतीने चर्चा केली. त्यावर नगराध्यक्षा तावरे यांनी देखील याबाबत माहिती घेतली. तसेच मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर नगरपरीषद कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.दादांना निवेदन दिल्यानेकामगारांना काढले१ मे कामगार दिन सर्वत्र साजरा केला जातो.याच दिवशी कंत्राटी कामगारांनी त्यांच्या प्रश्नाबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.पवार यांना निवेदन दिल्याने त्यामुळे १० कामगार कामावरुन काढले,तीन महिन्यांचा पगार दिला नाही, अशी या कामगारांची तक्रार आहे. त्यामुळे ‘१ मे ला दादांना निवेदन दिले म्हणुन १० कामगार कामावरुन काढले. आणि ३ महिन्यांचा पगार दिला नाही,’ असे निवेदनामध्ये नमुद केले आहे....निर्वाह निधी केवळ २५०० ते ५००० रूपयेबारामती नगरपरीषदेचे अनेक कंत्राटी कामगार गेल्या ४ ते ५ वर्षांपासुन काम करीत आहेत. परंतु त्यांंच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यावर केवळ २५०० ते ५००० रूपये जमा झाले आहेत.याची चौकशी करण्याची मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे.मंगळवारी (दि १२ )झालेल्या कामबंद आंदोलनाच्या वेळी कंत्राटी कामगांरानी या बाबीकडे लक्ष वेधले आहे.
कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:21 AM