अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण झाले आहे. अकोले ते भादलवाडी ते शिंदेवाडी असे तीन टप्प्यांतील सोळा किलोमीटरचे जमिनीखालून बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, आतील खोदलेल्या कामाचे सिमेंटचे अस्तरीकरण सुरू आहे.
दोन वर्षांपासून तावशी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतून आलेले अतिरिक्त पाणी उजनी धरणाच्या नदीपात्रात सोडण्यासाठी २४ किलोमीटर अंतराचा बोगदा सणसर, शिंदेवाडी, अकोले, भादलवाडीमार्गे खोदून पाणी उजनी जलाशयात सोडण्यात येणार आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शॉफ्ट खोदून बोगद्याच्या खोदाई सुरू असून, याठिकाणी जमिनीवरून सुमारे शंभर फूट खोल खाली खोदाई करून बोगद्याद्वारे आतमध्ये मशीनच्या साहाय्याने खोदाई सुरू आहे. मागील ४ वर्षांपासून या कामाला सुरुवात झाली आहे. २४ किलोमीटरपैकी सध्या १६ किलोमीटर बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच येत्या दोन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना रोगाची दक्षता घेऊन यंत्रसामग्री व मोजक्या मनुष्यबळाच्या जोरावर या बोगद्याचे काम सुरू आहे.
फोटो ओळ : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाचे अस्तरीकरण सुरू आहे.