पुलाचा काम रखडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना पारगाव या ठिकाणी जाण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. गेल्या वर्षी सुरू झालेले पुलाचे बांधकाम अजूनही अर्धवट आहे. पुलाच्या बांधकामाचे पायाभरणी होऊन गेल्या वर्षभरापासून बांधकाम रखडलेले आहे. या वर्षीचा पावसाळा सुरू झाला तरीही संबंधित ठेकेदाराने बांधकाम सुरू केलेले नाही. भीमा नदीच्या पाण्याचा जोर या पुलापर्यंत असतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुलाचे काम होणे कठीण असल्याचे स्पष्ट आहे. एकीकडे या भागातील रस्त्याच्या दुतर्फा व काटेरी झुडपे वाढले आहेत. त्यामुळे पुलाच्या जवळून काढलेल्या मार्गावरून जाताना झुडुपांमुळे त्या अरुंद मार्गाचा अंदाज येत नाही व वाहने रस्त्यावरून घसरून अपघात होत आहे. गेल्या वर्षभरात उसाच्या ट्रॅक्टरचे असे अनेक अपघात झाले आहेत.
वर्षभरापासून काम बंद; मात्र अपघात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:09 AM