पुणे : पीएमपीमधील कंत्राटी अधिकाऱ्यांना कोणत्याही स्वरूपात मुदतवाढ देऊ नये. ती दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पीएमटी कामगार संघाने (इंटक) दिला आहे. या अधिकाºयांपासून पीएमपीला कोणताही फायदा झालेला नाही, त्यामुळे निवृत्त होऊनही काही वर्षे झालेल्या व कंत्राटी स्वरूपात पीएमपीमध्ये नियुक्ती करून घेणाºया अधिकाºयांना तातडीने सेवामुक्त करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरूद्दीन इनामदार यांनी याबाबत पीएमपीच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे. खराडे म्हणाले, पीएमटी व पीसीएमटी विलीन करून पीएमपी स्थापन झाल्यानंतर अद्यापपर्यंत आस्थापना आराखडा मंजूर झालेला नाही. मध्यंतरी करण्यात आलेला आराखडा रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार नियुक्त केलेले निवृत्त अधिकारीही सेवामुक्त करायला हवेत. त्यांच्यापासून पीएमपीला फायदा व्हावा म्हणून त्यांची अनधिकाराने नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात आहे. संघटना ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.अधिकाऱ्यांना सेवामुक्त कराकंत्राटी पद्धतीने घेतलेल्या या अधिकाºयांना पीएमपीमधील सर्व महत्त्वाची पदे दिली आहेत. कामगारांना अहितकारक निर्णय घेण्याशिवाय त्यांच्याकडून काहीही होत नाही.राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे नियम डावलून त्यांना सेवेत घेतले गेले. वयामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यांच्या भरमसाट वेतनाचे ओझे विनाकारण पीएमपीवर पडते आहे. आधीच तोट्यात असलेल्या पीएमपीवर हा भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे या अधिकाºयांना त्वरित सेवामुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कंत्राटी अधिकाऱ्यांना कामगारांचा विरोध; पीएमपीमधील वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:15 AM