शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

गवंड्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक, प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:50 AM

पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य, गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित चार एकर शेती, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण या सर्वांवर मात करत मिळवले यश

कान्हूरमेसाई  -  पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य, गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित चार एकर शेती, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी शेतीबरोबरच गवंडी काम करत चार पैसे गाठीला बांधून दगडूभाई तांबोळी यांनी अमजदला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर अमजदनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सारा गाव गहिवरून गेला.ही कहाणी आहे अमजद दगडूभाई तांबोळी या तरुण तडफदार आणि तितक्याच सहनशील आणि चिकाटीवृत्तीच्या मुलाची आणि त्याच्या जिद्दी वडिलांची. शिरूर तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मुखई येथील सामान्य गवंडी काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने जिद्दीच्या जोरावर उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातली.घरातील तुटपुंजी शेती असताना त्यात मेहेनत करून त्याचा जोड म्हणून गवंडी काम करत दगडू यांनी अमजदचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. बारावीनंतर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून अमजद यांनी बीएस्ससी अ‍ॅग्री पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील राहुरी येथे २ वर्षे एमएस्ससी अ‍ॅग्री पदवी घेतली आणि त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत थेट चौदावा क्रमांक मिळविला.घरात दोन वेळ खायची वाणवा, असे दिवस काढलेल्या अमजद यांनी मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच; मात्र तब्बल बारा-बारा तास अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले.परिस्थिती इतकी बिकट होती दहावी-बारावीतच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाही मला खासगी शिकवणी लावता आली नाही; मात्र शिकवणी असेल तरच यश मिळते असे नाही, तर स्वंयशिस्त आणि अभ्यासाचे नियोजन चांगले असेल तर नक्की यश मिळते.- अमजद तांबोळी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस