पुणे : ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या महत्वाच्या कार्यामध्ये भूमिका बजावणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे़. या सत्कारामुळे आमची जबाबदारी अजून वाढली आहे, असे पुणे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़. पुणे शहरात नुकतेच १०० ग्रीन कॉरिडॉर्सचा महत्वाचा टप्पा पार केला़. त्यात अनेक संस्था आणि यंंत्रणांचा महत्वाचा वाटा होता़. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याकरीता रुबी हॉल क्लिनिकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते़. या कार्यक्रमात वाहतूक पोलिस, झेडटीसीसी, पुणे विमानतळ, पत्रकार संघ यांसारख्या महत्त्वाची भूमिका बजावणाºया संस्थांमधील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, वाहतूक शाखेचे माजी उपायुक सारंग आव्हाड, पुणे विमानतळाचे सहकामकाज सरव्यवस्थापक संजय दुलारे, पुणे विमानतळ येथील असिस्टंट कमांडंट सीआयएसएस जी.जी.भार्गव, झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एफ. एफ. वाडिया, झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे, वरिष्ठ हदयरोगतज्ञ डॉ. आर. बी. गुलाटी व डॉ. जगदीश हिरेमठ आदी उपस्थित होते. यावेळी अद्वैत केळकर यांच्या हस्ते पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांचा सत्कार करण्यात आला़.ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करत असताना शहर आणि ग्रामीण पोलीस या दोन्ही यंत्रणांसोबत संवाद साधावा लागतो आणि या दोन्ही यंत्रणांचे ग्रीन कॉरिडॉरसाठी संपूर्णपणे समर्पित कार्य कौतुकास्पद आहे, असे झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले यांनी सांगितले़.रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की,पुणे शहरासाठी १०० ग्रीन कॉरिडॉर हा एक महत्त्वाचा टप्पा असून अवयव प्रत्यारोपणाबाबत भारतात पुणे आघाडीच्या शहरांपैकी एक आहे. रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की, ग्रीन कॉरिडॉरला लोकांकडून चांगले सहकार्य मिळाले असून खºया अर्थाने त्यांनी ही संकल्पना स्विकारली आहे.पोलिस आणि एअरपोर्ट यंत्रणा यांची यामध्ये अमूल्य भूमिका असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. याप्रसंगी डॉ.संजय पठारे यांनी सध्याच्या प्रत्यारोपणाच्या स्थितीबाबत सादरीकरण केले, तर डॉ. किशोर पुजारी यांनी आभार मानले.