प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील प्रसिद्ध मूर्तिकार सुप्रिया शिंदे व मूर्तिकार सचिन घोडेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण चिखले, सचिव आदिनाथ थोरात व सर्व रोटरीयंस उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी मंचर परिसरातून १०० मुले व मुलींनी सहभाग घेतला. मूर्तिकार सचिन घोडेकर यांनी मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले व सुप्रिया शिंदे यांनी मुलांना शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीचे फायदे व पर्यावरणविषयी माहिती समजावून सांगितली. या कार्यशाळेसाठी मुलांनी चांगला प्रतिसाद देऊन प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ रोटेरियन इंजिनिअर बाळासाहेब पोखरकर, अविनाश ढोबळे, सचिन काजळे, सचिन चिखले, सागर काजळे, दीपक चौरे, रामशेठ मींडे, आशिष पुंगलिया, तुषार कराळे, भूषण खेडकर, अजयशेठ घुले, प्रशांत बागल, जनार्दन मेंगडे, ॲड. बाळासाहेब पोखरकर, सचिन बांगर, दीपक भेके आदी रोटरीयंस उपस्थित होते.
रोटरी क्लबच्यावतीने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.