- प्रकाश शेलार-
केडगाव : गलांडवाडी (ता. दौंड) येथील गावामध्ये गावच्या लोकसंख्येएवढी झाडे गावाने जोपासली आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे २५00 असून, अडीच हजार झाडे गावांनी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, ती झाडे टिकवली देखील आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील एक वेगळा गाव किंवा पर्यावरण समृद्ध गाव म्हणून जिल्ह्यामध्ये समोर येत आहे.सुमारे आठ वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी जितकी लोकसंख्या तितकी झाडे, हा संकल्प केला आणि बावीस फाटा येथून गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. विशेष म्हणजे, ठिबक सिंचन पद्धतीने ती सर्व झाडे जोपासलेली आहेत. त्यामुळे गावामध्ये प्रवेश करतानाच सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ती दुतर्फा झाडीमुळे त्याची सावली पडते व गावातील प्रवेश अतिशय सुखद होतो. गावाच्या बाजूला जाणाºया तीनही रस्त्यांवर गलांडवाडी, ता. खुटबाव, गलांडवाडी ते पारगाव,तसेच गलांडवाडी ते देलवडी या ठिकाणी दुतर्फा झाडे लावलेली आहेत. ..........
राजकारण बाजूला ठेवून कार्य... गावाला यानिमित्त पर्यावरण समृद्ध गाव, विकास रत्न यासारखे राज्यपातळीवरील वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. यासंदर्भात, गावच्या सरपंच पल्लवी कदम म्हणाल्या की, गाव करील ते राव काय करेल, या भावनेतून ग्रामस्थ एकत्रित येऊन योजनेची आखणी करतात. त्याचे नियोजन ठरल्याप्रमाणे होते.
राजकारणापुरते राजकारणी, इतर वेळेस समाजकारण ही या गावाची ख्याती असून, गावातील अपवाद वगळता बहुतांशी निवडणुका बिनविरोध होतात. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आदर्श सांसद ग्राम म्हणून हे गाव दत्तक घेतले आहे. सर्वांच्या सहकार्यातून गावचा विकास प्रगतीपथावर आहे........माजी सरपंच उत्तम खाडे यांच्या संकल्पनेतून ही झाडे लावलेली आहेत. विद्यमान सदस्य व ग्रामस्थांनीसुद्धा ही झाडे जोपासलेली आहेत. ४माजी सरपंच ज्योती शितोळे यांच्या प्रयत्नांतून गावांमध्ये पर्यावरण संतुलित ५० कुटुंबांनी गोबरगॅस उभारलेला आहेत, त्यामुळे गॅसची बचत होतेच परंतु पर्यावरणाचेही रक्षण केले जाते.