यावेळी आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, गोविंद तौर, आप्पाजी चिताळकर आदी उपस्थित होते.
आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांचे माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था विकसित करण्यात आली. या ठिकाणी वृक्षांना पाणी देण्यासह पाण्याचे टाकीत टँकरने पाणी भरण्यात आले. पुढील महिनाभर वृक्षांना पाणी देण्याची यातून व्यवस्था करण्यात आली आहे.
माउलींच्या पादुका परिसरातील वृक्षांना यावेळी पाणी देत वृक्ष संवर्धनास गती देण्यात आली. वृक्षांसह परिसरात पाणी देऊन पर्यावरणीय सामाजिक उपक्रम वन दिनी साजरा करण्यात आला. या भागात येणाऱ्या नागरिकांनी पाण्याचे टाकीतून पाणी घेऊन नियमित वृक्षांसह पक्ष्यांना देण्याचे आवाहन यावेळी अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी केले.