शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

जागतिक मातृदिन विशेष : मी 'बाई' नसले म्हणून काय झालं, 'आई' तर आहे ना !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 9:07 PM

 'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं  आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून घेतलं आणि आयुष्य सफल झालं' हे शब्द आहेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बी पन्ना गाबरेल यांचे. 

नेहा सराफ 

पुणे : 'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं  आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून घेतलं आणि आयुष्य सफल झालं' हे शब्द आहेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बी पन्ना गाबरेल यांचे. फक्त पन्ना नाही तर पुण्यातील अनेक तृतीयपंथी मुल दत्तक घेऊन मातृत्व अनुभवत आहेत. वस्तू घरात नेणं सोपं असतं पण चालतंबोलतं मुल म्हटलं की त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या येतात. त्यामुळे आपल्या आयुष्याची आणि समाजच्या फटकून वागण्याची झळ मुलांना बसू नये म्हणून ते विशेष प्रयत्न करतात. 

याबाबत पन्ना सांगतात, 'आज मुलगी महाराष्ट्राबाहेर महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिथे मी तिला तीन महिन्यातून भेटायला जाते.ती कधीही पुण्यातील बुधवार पेठेत आलेली नाही. आपली आई तृतीयपंथी असल्याचे तिला माहिती आहे. मात्र तिने त्याविषयी कधीही उच्चार न केलेला नाही. शेवटी तिच्यासमोर माझे अस्तित्व आई म्हणून आहे हे महत्वाचे. पूर्वी तृतीयपंथीयांना मुल दत्तक दिले जात नव्हते. आता गौरी सावंत यांच्यापासून त्यालाही सुरुवात झाली आहे. मात्र आम्ही घेतलेली मुले ही अनेकदा आजूबाजूच्या वस्तीत जन्मलेली आहेत. त्यांची आई पालनपोषण न करू शकणारी तर वडील अस्तित्व नाकारणारे होते. त्यामुळे त्यांना कुठेतरी टाकून त्यांचे आयुष्य बरबाद होण्यापेक्षा अनेक हिजड्यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. आमच्यापैकी काहींनी तर त्यासाठी बुधवार पेठेतून बाहेर पडून शहराच्या उपनगरात घरे घेतली आहे. या मुलांचे संगोपन सर्वसामान्य वातावरणात व्हावे असे आम्हाला वाटते. 

  अशोक (नाव बदललेले) यांनीही मुलगा दत्तक घेतला असून तो आता आठवीत शिकतो. ते सांगतात, 'माझा मुलगा आठवीत आहे पण मला अजूनही त्याला मी तृतीयपंथी असल्याचे सांगितलेले नाही. आजही तो मला मामा म्हणूनच हाक मारतो.मात्र आता हा मुलगाच माझं आयुष्य आहे. उद्या मी हे बाळ घेतलं नसतं तर कदाचित ते पाकीटमार किंवा दलालही बनले असते. एक नवं जग त्याला माहिती व्हावं म्हणून मी हे छोटंसं पाऊल उचललं'. 

या मुलांना प्रत्यक्ष तुझी आई किंवा वडील हे तृतीयपंथी आहेत हे सांगायची वेळ येते तेव्हा मात्र अनेकांनी स्पष्ट सांगितलं. पन्ना म्हणतात, 'बाहेरून समजण्यापेक्षा आपण सांगितलेलं अधिक चांगलं. कारण कधीतरी हे सत्य समजणार आहेच. हा विचार करून मुलगी बारा वर्षाची झाल्यावर मी तिला सत्य सांगितलं आणि तिने ते स्वीकारलंही. अशोक यांचे मात्र याबाबत वेगळे मत असून योग्य वेळ आल्यावर आणि मूल पुरेसे मोठे झाल्यावर समुपदेशन करून त्याला कल्पना द्यावी. पन्ना आणि अशोक यांनी मुलाला आपलेच नाव लावले आहे. मात्र अनेक तृतीयपंथी आजही त्याला स्वतःऐवजी आपल्या वडिलांचे नाव देतात.शेवटी  नावापेक्षाही नातं महत्वाचं आहे. जगाने अनेकदा द्वेष आणि अपमान दिल्यावरही आई होऊन एका कोवळ्या जीवाचं आयुष्य फुलवणाऱ्या या खरं स्त्रीत्व जपणाऱ्या तृतीयपंथीयांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेTransgenderट्रान्सजेंडरbudhwar pethबुधवार पेठ