यानिमित्ताने निसर्ग निर्वचन केंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक वनसंरक्षक दिलीप भुर्के हे होते. त्यांनी जागतिक व्याघ्र दिन आणि वन्यजीवनाबाबत जागरूकता व त्यांचे आपल्या जीवनातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीव प्राणिशास्त्र अभ्यासक तुषार पवार यांनी वाघाचे अधिवास, आहार, उत्पत्ती, स्वभाव, वाघाची शिकार, वाघाबाबत मत प्रवाह तसेच वाघा बाबतची काही सत्य आपल्या सादरीकरणात मांडली.
वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी वाघाचे निसर्गातील महत्व तसेच वाघाची अन्नसाखळीतील अनन्यसाधारण भूमिका व वातावरणातील बदल यावर मत मांडले.
या वेळी वाघावरती चित्रित केलेल्या शेरणी चित्रपट प्रक्षेपित करण्यात आला. या वेळी वन्यजीव विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामपरिस्थितीकी विकास समितीचे सदस्य तसेच कल्पवृक्ष या सामाजिक संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : 30072021-ॅँङ्म-ि02
फोटो ओळी : भीमाशंकरमध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जमलेले वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी.