लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकमत आणि इन्स्टिट्यूट आॅफ योगा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस कृष्णसुंदर गार्डन येथे नुकताच झाला. या वेळी योगाचार्य विदुला शेंडे व त्यांचे सहकारी उमा बटाले, श्वेता जोशी, ऐश्वर्या कुलकर्णी , विराज शेंडे आणि डॉ. सुनीता कटारिया यांनी उपस्थितांकडून जागतिक योग दिवसाची मानांकित आसनप्रणाली, आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार करून घेतली. मनुष्याच्या मानसिक, आध्यात्मिक, सार्वजनिक आणि ज्ञानवाढीसाठी त्याचबरोबर कुटुंबव्यवस्थेसाठी योग ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असून त्याचे अनेक पैलू मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करतात. सर्वांनी योग करणे गरजेचे आहे. मानसिक आजार, मधुमेह, सांधेदुखी, डोळ्यांचे आजार यावर योग हा उत्तम उपाय असल्याचे मत विदुला शेंडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी छत्रपती पुरस्कारविजेते डॉ. दिनेशकुमार पांडे यांचा सन्मान करण्यात आला, विश्वास शेंडे यांनी प्रास्ताविक केले. संजीव पाध्ये यांनी आभार मानले.
जागतिक योगदिनी ‘योग’दान
By admin | Published: June 28, 2017 4:23 AM