पुणे : सध्या जगभरामध्ये काेराेना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जगातील लाखाे नागरिक या विषाणूमुळे बाधित झाले आहे, तर हजाराे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जागतिक आराेग्य संघटनेकडून या राेगाला 2020 मधील महामारी असल्याचे म्हंटले आहे. जगभरातील सर्वच देशात काेराेनाची साथ पसरली आहे. यापूर्वी देखील जगभरात अनेक साथीच्या राेगांची साथ पसरली हाेती. या साथीच्या राेगांमुळे लाखाे नागरिक मृत्यूमुखी पडले हाेते. पुढील 14 साथीचे राेग महाभयंकर राेग म्हणून ओळखले जातात.
1. प्रिहिस्टाॅरिक एपिडेमिक
5 हजार वर्षांपूर्वी चीनमधील एका गावामध्ये हा साथीचा आजार पसरला हाेता. एकाच घरात विविध वयाेगटातील लाेकांचे सांगाडे सापडले हाेते. पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते हा राेग इतक्या वेगाने पसरला हाेता की तेथील लाेकांना दफण करण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळाला नाही.
2. प्लेग ऑफ अथेन्स
साडेचार हजार वर्षांपूर्वी अथेन्स आणि स्पार्टा या दाेन देशांमध्ये झालेल्या युद्धाच्या दरम्यान हा राेग पसरल्याचे बाेलले जाते. अथेन्समध्ये हा राेग तब्बल पाच वर्षे धुमाकूळ घालत हाेता. या राेगाच्या साथीमध्ये एक लाखांहून अधिक लाेकांना आपले प्राण गमवावे लागले. या राेगामुळे अथेन्समधील लाेक अचानक आजारी पडू लागले. युद्धाच्या काळात अनेक लाेक एकत्र आल्याने हा राेग झपाट्याने पसरल्याचे म्हंटले जाते.
3. अॅनटाेनाईन प्लेग
पार्शिया साेबत युद्ध लढून जे्व्हा राेमन सैन्य परतले तेव्हा ते हा राेग घेऊनच परत आले. या राेगामुळे 5 दशलक्ष सैनिक आणि नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या साथीच्या राेगामुळे संपूर्ण राेमन साम्राज्यातील शांतता भंग झाल्याचे म्हंटले जाते.
4. प्लेग ऑफ सिप्रियन
युराेपामध्ये पसरलेल्या या आजारामुळे संपूर्ण जग नष्ट हाेते की काय अशी शंका निर्माण झाली हाेती. या राेगामुळे राेममधील 5 हजार नागरिक एकाच दिवशी मृत्युमुखी पडले हाेते. राेममध्ये विविध ठिकाणी पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांना अनेक ठिकाणी लाेकांचे सांगाडे सापडले हाेते. हा राेग आणखी पसरू नये म्हणून मेलेल्या लाेकांचे शरीर जाड चुन्याच्या आवरणामध्ये पुरण्यात आले हाेते. तर अनेक ठिकाणी मृत शरीरं हाेळी करुन त्यात जाळण्यात आली हाेती.
5. द ब्लॅक डेथ 1346 ते 1353
आशिया खंडातून युराेपात हा राेग पसरल्याचे म्हंटले जाते. संशाेधकांच्या मते या राेगामुळे अर्ध्याहून अधिक युराेपातील लाेकसंख्या बाधित झाली हाेती. उंदरातून हा आजार माणसात आला हाेता. या राेगामुळे युराेपात हाहाकार माजला हाेता. युराेपात या राेगानंतर कामगार मिळेनासे झाले हाेते. माेठमाेठ्या थडग्यांमध्ये मेलेल्यांचे मृतदेह त्यावेळी पुरण्यात आले.
6. काेकाेलिझी एपिडेमिक 1545 ते 1548
या राेगामुळे मेक्सिकाे आणि मध्य अमेरिकेतील 15 दशलक्ष नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या राेगामध्ये ताप येऊन शरीरात माेठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव हाेऊन व्यक्तीचा मृत्यू हाेत असे.
7. ग्रेट प्लेग ऑफ लंडण 1665- 1666
दुसरा किंग चार्ल्सच्या काळात ब्रिटनमध्ये या राेगाची साथ पसरली. 1665 च्या एप्रिलमध्ये या राेगाची साथ पसरण्यास सुरुवात झाली. संपूर्ण उन्हाळ्यात ही साथ पसरत राहिली. उंदरामुळे मानवात हा राेग आल्याचे नंतर स्पष्ट झाले. जेव्हा ही साथ आटाेक्यात आली तेव्हा तब्बल एक लाख लाेकांना आपले प्राण गमवावे लागले हाेते. तर लंडण शहरातील 15 टक्के लाेकसंख्या या राेगात मारली गेली हाेती.
8. अमेरिकन पाेलिओ 1916
अमेरिकेतील न्यूयाॅर्क या शहरापासून या राेगाची साथ पसरण्यास सुरुवात झाली. यात सहा हजार जणांचा मृत्यू झाला तर 27 हजार लहान मुलांना याची लागण झाली. या राेगावर लस तयार झाल्यानंतर हा राेग हळूहळू संपुष्टात येऊ लागला. 1979 मध्ये अमेरिकेत पाेलिओचा शेवटचा रुग्ण आढळला हाेता.
9. एशियन फ्लू 1957 ते 1958
एशियन फ्लू ची सुरुवात चीनमधून झाली हाेती. या राेगामुळे एक दशलक्ष नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले हाेते. हा आजार 1957 त्या फेब्रुवारीमध्ये सिंगापूरला माेठ्याप्रमाणात पसरला. त्यानंतर एप्रिल मध्ये हाॅंगकाॅंग तर अमेरिकेत 1957 च्या उन्हाळ्यात ताे पाेहचला. यात अमेरिकेतील एक लाख 16 हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
10. एड्स
आत्तापर्यंत या राेगामुळे जगभरात 35 दशलक्ष नागरिकांचा जीव गेला आहे. 1920 मध्ये आफ्रिकेतील चिंपाझी या माकडापासून मानवात हा राेग पसरला. 20 शतकात एड्स हा राेग महामारी म्हणून घाेषित करण्यात आला. या राेगावर अद्याप कुठलेही औषध नाही. परंतु 1990 सालापासून तयार करण्यात आलेल्या काही औषधांमुळे एड्सच्या रुग्णाला सर्वसामान्य आयुष्य जगता येते. 2020 साली दाेन व्यक्ती या आजारातून पुर्णपणे मुक्त झाल्याचे समाेर आले आहे.
11. एच 1 एन 1 स्वाईन फ्लू 2009 - 2010
2009 साली मेक्सिकाेमधून या राेगाची लागण हाेण्यास सुरवात झाली. या राेगाने जगभरातील 1. 4 बिलियन लाेक बाधित झाले. तर 5 लाख 75 हजार 400 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. हाे राेग लहानमुले व तरुणांमध्ये माेठ्याप्रमाणावर पसरला. यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 80 टक्के लाेक हे वय वर्ष 65 च्या आतील हाेते.
12. वेस्ट आफ्रिकन ईबाेला 2014 - 2016
इबाेलामुळे पश्चिम आफ्रिकेचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. 2014 ते 2016 या काळात 28 हजार 600 इबाेलाच्या केसेस समाेर आल्या तर 11 हजार 325 मृत्यू इबाेलामुुळे झाल्याचे समाेर आले. लायबेरिया आणि सायरियामध्ये या राेगाचा माेठयाप्रमाणावर फैलाव झाला.
13. झिका व्हायरस 2015
दक्षिण व मध्य अमेरिकेत या राेगाचा फैलाव झाला. विशिष्ट प्रकारचे डास चावल्याने या राेगाची लागण हाेते. झिकाचा डास चावल्याने गर्भाशयातील बाळावर त्याचे परिणाम हाेऊ शकतात. या राेगामुळे जन्मलेल्या बाळामध्ये अनेक व्याधी देखील निर्माण हाेऊ शकतात.
14. काेराेना 2019
काेराेनाची सुरुवात 2019 च्या शेवटी चीनमधील वुहान प्रांतातून झाली. वटवाघळापासून हा राेग माणसात आल्याचे म्हंटले जाते. थुंकीतून हा राेग पसरताे. आत्तापर्यंत जगभरातील सर्वच देश या राेगामुळे बाधित झाले आहेत. या राेगाला महामारी म्हणून जागतिक आराेग्य संघटनेकडून घाेषित करण्यात आले आहे. हा राेग माेठ्याप्रमाणावर जगभरात पसरत असून माेठी जीवित हानी यामुळे झाली आहे.