शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका

By admin | Published: January 02, 2017 2:22 AM

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण भागातील स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाला याचा मोठ्या प्रमणात फटका

बारामती : नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण भागातील स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाला याचा मोठ्या प्रमणात फटका बसला. शेतमालाचे दर कमालीचे घसरले. तर जिल्हा बँकांवरील निर्बंधांमुळे शेती व्यवसायाच्या आर्थिक नाड्याच आवळल्या गेल्या आहेत. पंतप्रधन नरेंद्र मोदींनी ५० दिवसांनंतर नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत बदल होईल असा विश्वास दिला होता. परंतु नोटाबंदी आणि कॅशलेसच्या धामधुमीत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. ५० दिवसांनंतरही परिस्थितीत बदल न घडल्याने आता ग्रामीण भागामध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय, आठवडी बाजार, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतमजूर आदींना नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. चलनटंचाईमुळे शेतमाल घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आजही ग्रामीण परिसरात कायम आहे. तर जे व्यापारी शेतमाल उचलण्यास तयार आहेत, ते दर पाडून शेतमाल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान सोसून शेतमालाची विक्री करीत आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, शेळगाव, गोतोंडी आदी भागांमध्ये सध्या डाळिंबाच्या बागा सुरू आहेत. नोटाबंदीपूर्वी डाळिंबाच्या १ नंबरच्या गुणवत्तापूर्ण फळांना ९० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु तोच दर सध्या ५० ते ६० रुपयांपर्यंत आला आहे. प्रतिकिलो ३० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. यातून उत्पादन खर्च निघत असला तरी पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात भांडवल राहात नसल्याने पुढील हंगामात फळबागा कशा जगवायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. तीच परिस्थिती दुग्धव्यावसायिकांची झाली आहे. दुधाचे पगार मिळत आहे. मात्र पूर्वी रोखीने मिळणारे पगार आता थेट खात्यात जमा होऊ लागले आहेत. मात्र बहुतेक दुग्धव्यावसायिकांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये आहेत.जिल्हा बँकांवरील निर्बंधांमुळे खात्यावरील पैसे काढण्याची मर्यादा आहेत. तसेच दूध संस्थांनीही राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच खाती काढण्याचे आवाहन दुग्धव्यावसायिकांना केले आहे. त्यात दुधाचे दरही २२ रुपयांवरून पुढे सरकले नसल्याने जनावरे संभाळणे जिकिरीचे झाले आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च, चलनटंचाई, कॅशलेस यंत्रणेबाबत असलेली संभ्रमावस्था यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता जाणकरांमधून व्यक्त होत आहे.बँकेतील गर्दी काही केल्या कमी होईना...वाडा : परिसरातील नागरिकांकडून ५०० व १००० हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या देशात शेतकरीवर्ग ७० टक्केच्या जवळपास असून, बाकी ३० टक्के टक्के नागरिकांची आर्थिक बाजू चांगली आहे. काळा पैसा शोधण्यासाठी घेतलेला निर्णय सामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. नोटाबंदी झाल्यापासून वाडा येथील एटीएम बंद होते. ते आता शनिवारपासून सुरू कण्यात आले आहेत. या परिसरात एकच एटीएम असल्याने बँकेत होणाऱ्या गर्दीला वैतागून एटीएमकडे धाव घ्यावी असे नागरिकांना वाटत होते. पण ते बंद असल्याने नागरिकांना बँकेत ताटकळत थांबावे लागत आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून जास्त रक्कम काढता येते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दोन हजार रुपये मिळत आहेत. कधी बँकेकडे कॅश आलीच नाही तर नागरिकांना पैसे मिळत नाहीत. काही नागरिक पैसे आले नाही तर आमचे पासबुक ठेवून घ्या, दुसऱ्या दिवशी तरी पैसे द्या असे म्हणत आहेत. बँक कर्मचारी म्हणतात, की कॅशच आली नाही तर तुमचं पासबुक ठेवून काय करू. ५० दिवसांपासून कामधंदा सोडून केवळ पैशासाठी रांगा लावत आहे. कधी सुटणार हा काळ्या पैशाचा खेळ? असा सवाल नागरिक करत आहेत.