शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

बहुसंख्य मराठी कलावंतांची हाताची घडी, तोंडावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शेतकरी आंदोलना’चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शेतकरी आंदोलना’चे पडसाद देशभरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा सडाच पडतो आहे. आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर देशात उसळलेली प्रतिक्रियांची लाट तर कमी होण्याचं नावच घेत नाहीये. पण या सगळ्यात ‘फार कमी’ मराठी सेलिब्रिटी स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. त्यांपैकीच काही जणांशी ‘लोकमत’ने बातचीत केली.

सरकारच्या दांभिकतेचे दर्शन

सर्वात आधी या प्रकारात झालेल्या कुठल्याही हिंसेचे समर्थन मी करीत नाही. वारंवार चळवळ अथवा आंदोलन हिंसक वळण घेत असेल त्या आंदोलनाने स्वपरीक्षण करायला हवे. पण त्याच बरोबरीने आपल्याच देशातील जनतेवर जेव्हा येथील सरकारी यंत्रणा, पोलीस हिंसक कारवाया करते तेव्हा ते अधोगतीकडे जाणाऱ्या लोकशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. एका बाजूला आपण कसे सेवक आहोत, असे दाखवणे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसमावेशकता तसेच लवचिकता नसणे असा दांभिकपणा सरकारमध्ये दिसत आहे. हे भांडण राजकीय आहे. त्यामुळे यात दोन किंवा अधिक बाजू असणारच पण विरोध करणाऱ्या कुणालाही दरवेळी देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत भेदरलेल्या आणि सत्ताभिलाषी व्यवस्थेचे लक्षण आहे. होय, कुणाचेही हेतू राजकीय असतातच आणि असायला हरकतही नाही. पण ते हेतू लोकहितासाठी आहेत की केवळ विशिष्ट गटासाठी किंवा ‘आहे रे’ स्तरातील लोकांच्या फायद्याचे आहेत हा मूळ प्रश्न आहे.

- सुव्रत जोशी, अभिनेता

------

अभ्यास केल्याशिवाय बोलू नये

महत्त्वाच्या विषयावर अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. लोकांना घाणेरडी सवय लागलेली आहेत? की ज्या विषयात आपल्याला गती नाही, अभ्यास नाही अशा विषयावर बेधडक लोक मतं देतात. शेतकरी आंदोलनावर बोलायचं म्हणजे हे माहिती पाहिजे की ते शेतकरी नेमके कुठले आहेत? त्यात शेतकरी आहेत की कंत्राटदार आहेत? हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत? की उत्स्फूर्तपणे आहे? अतीव माहितीमुळे आतून येणाऱ्या गोष्टी कमी आहेत, बाहेरूनच होणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. त्यामुळे मी यावर काय बोलणार? आणि मग असं काहीतरी बोलायचं, पण तेंडुलकर, कोहली जे बोलताहेत तर लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा, याला काही अर्थ आहेत का? त्यामुळे ज्याने त्याने उठून आपलं मत देऊ नये, मत देण्याआधी त्या गोष्टीचा अभ्यास करावा.

- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

------

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मी स्वतः एक शेतकरी आहे. माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. आज गेल्या कित्येक महिन्यांपासून आपलं घरदार, शेती सोडून जर शेतकरी रस्त्यावर बसले आहेत तर खरंच त्यांना काही अडचणी असतील म्हणून बसले आहेत. असंच कुणी इतके हाल नाही? सोसत. विसंवादाचाही मुद्दा आहेच. जो दोन्ही बाजूने होतोय. जे शेतकरी हट्टाने बसले आहेत तो असंतोष आहे हे सरकारच्या लक्षात येत नाहीये का? हे असं कोणतं सरकार आहे जे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ शकत नाही? सरकार जोपर्यंत केवळ राज्यकर्त्यांच्या भूमिकेत राहतील तोपर्यंत ही दरी कायम राहील. त्यामुळे या शेतकरी आंदोलनाला, माझ्या शेतकरी बापाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे.

- हेमंत ढोमे, अभिनेता

--------

मला पुरेशी माहिती नाही

मला कृषी कायदा नेमका काय आहे, याविषयी माहिती नाही. तो जर मला माहीत नसेल तर त्यावर बोलणं चुकीचं आहे. यात दोन प्रवाह आहेत, काही सांगताहेत की कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, काही सांगताहेत की जे मोदी विरोधात आहे त्यांनी हे आंदोलन घडवून आणलंय. ज्यामुळे जे आपल्याला धड माहिती नाही त्याविषयी बोलू नये या मताचा मी आहे.

- शरद पोंक्षे, अभिनेता

--------------

खुल्या दिलानं चर्चा करावी

मला मनापासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावासा वाटतो. शेती कायदे, त्याच्या योग्य-अयोग्य बाजू यावर मत व्यक्त करावं एवढं माझं ज्ञान नाहीये. याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आपल्या देशातला एवढा मोठा घटक, एवढ्या मोठ्या संख्येने इतके दिवस तिथे ठाण मांडून बसलेला आहे, तर त्यांना सरकार सामोरं जात नाहीये. दुरून केवळ चर्चेच्या फायरी झाडत राहणं आणि ते देशविघातक माणसं असल्यासारखी त्यांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर खिळे लावून रस्ता बंद करणं म्हणजे हे मला खूप दुर्दैवी वाटतं. याउलट खुल्या दिलानं चर्चेचं वातावरण देशात तयार व्हायला हवं.

- सुनील सुकथनकर, दिग्दर्शक