शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे अत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
3
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
4
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
6
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
7
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
8
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
9
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
10
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
11
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
12
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
13
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
14
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
15
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
17
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
19
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
20
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:56 AM

‘‘सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी, आयुष्याला थेट भिडावे कविता लिहिण्यासाठी, उभ्या जगाची व्यथा असू दे छोटी अथवा मोठी,

पुणे : ‘‘सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी,आयुष्याला थेट भिडावे कविता लिहिण्यासाठी,उभ्या जगाची व्यथा असू दे छोटी अथवा मोठी,गळ्यात पडूनी तिच्या रडावे कविता लिहिण्यासाठी...’’या गझलकार रमण रणदिवे यांच्या कवितेने श्रोत्यांना कविता कशी लिहावी याची अनुभूती दिली.निमित्त होते ‘लोकमत’तर्फे आयोजित काव्यॠतू स्पर्धेच्या लोगोच्या अनावरण सोहळ्याचे. कवितेचा प्रवास वैयक्तिक ते वैश्विक असा होत असतो. कवितेतून जगणे अणि जगण्यातून कविता उमटते, अशा शब्दांत मान्यवर कवींनी कवितेच्या गावाची सफर घडवली.युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने ‘काव्यऋतू’ पुरस्काराचा वितरण सोहळा व कविसंमेलन सोमवारी (दि. १३) आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या लोगोचा अनावरण सोहळा ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी, कवयित्री आश्लेषा महाजन या मान्यवरांच्या हस्ते झाला. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. या वेळी कवींनी कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया, कवितेची सद्य:स्थिती यावर प्रकाश टाकत कवितांचे सादरीकरण करत वातावरण ‘शब्द शब्द जपून ठेव’ असे केले.रमण रणदिवे म्हणाले, ‘खेड्यापाड्यातही कविता लिहिली जात आहे, हे आशादायी चित्र आहे. कविता म्हणजे रक्त-मांसाच्या अस्तित्वाला आलेला जाणिवांचा मोहोर असतो. कविता माणसाच्या मनातला कोलाहल असतो. चुकून झालेला अथवा मुद्दाम केलेला स्पर्श स्त्रीला अचूक कळतो, त्याप्रमाणे मुद्दाम केलेली कविता चाणाक्ष रसिकाला अचूक कळते. त्यामुळे कविता अत्यंत जबाबदारीने लिहिली पाहिजे. मानवी नातेसंबंधातील लळ्यापेक्षा कवितेचा लळा अथांग असतो. कविता सर्वांत प्रामाणिक आणि सोबत करणारी असते. समाजाच्या संक्रमण काळात कवीने प्रामाणिकपणे मार्गदर्शन करायचे असते, मानवतेची मंदिरे वाचवायची असतात. ’आश्लेषा महाजन म्हणाल्या, ‘मी कवितेतून बोलते, कवितेचा विचार करते म्हणून मला कविता स्फुरते. कविता सुचण्याचा क्षण अत्यंत आनंद देणारा असतो. दृकश्राव्य माध्यमे प्रभावी होत असतानाही कवितेचे अस्तित्व टिकून आहे. सध्या अभिरुची आणि अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाले आहे. या काळातही कविता अंतर्मुख करते. कवीने स्वान्तसुखाय लिहिलेली कविता इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. रसिकांना, वाचकांच्या मनात शिरून त्यांचेच भाव प्रतिबिंबित करणारी, शाश्वत मूल्ये देणारी, प्रकाशाकडे नेणारी कविता लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कवितेतून उमटणारे सकारात्मक भाव प्रेरणा देतात.’जागतिकीकरणानंतर निर्माण झालेला जगण्याचा तीव्र संघर्ष आणि अस्तित्वाचा प्रश्न कवी ताकदीने मांडत आहेत. आजची मराठी कविता केवळ पुण्या-मुंबईची राहिलेली नाही, ग्रामीण भागातील कवीही दर्जेदार लेखन करत आहेत. कविता अत्यंत छान वळणावर पोहोचलेली आहे. कवितेची विविध विलोभनीय रूपे मनाला भावतात.’कविता शिकवता येत नाही१ कविता ही व्यक्तिसापेक्ष असते. कोणाला कोणती कविता आवडावी, हे पूर्णपणे व्यक्तीच्या अभिरुचीवर अवलंबून असते. कविता शिकवता येत नाही किंवा कार्यशाळा घेता येत नाही.२ मी कविता करत नाही, तर ती आतून येते. जीवनाकडे कानांनी पाहतो आणि डोळ्यांनी ऐकतो, तेव्हा कविता निर्माण होते. कवी दु:खी असेल तरच त्याला दु:खी कविता सुचतात, असे होत नाही. कवी प्रत्येक जीवनप्रवाहात सामील होतो.३ जीवनानुभवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी कविता शिकवून जाते. आजकाल आयुष्याचा आकृतिबंध मर्यादित झाला आहे. दीर्घकविता वाचायला, ऐकायला कोणाकडे वेळ नाही. मात्र, कवितेला मोजपट्टी कशी लावणार, हाही प्रश्न आहे, असे कवी हिमांशू कुलकर्णी यांनी सांगितले.