पुणे : लेखक- दिग्दर्शक प्रविण तरडेंना त्यांच्या पाैड राेडवरील कार्यालयात अाज दुपारी अडीजच्या सुमारास मारहाण करण्यात अाली. त्यांचा बहुचर्चित मुळशी पॅटर्न हा सिनेमा लवकरच प्रदर्शित हाेणार असून या सिनेमातील अारारा या गाण्यामध्ये स्थानिक गुंड नाचताना दिसत असल्याने वाद निर्माण झाला हाेता.दरम्यान माराहाण नाहीतर काहीशी झटापट अाणि बाचाबाची झाली असून हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे प्रविण तरडे यांनी फेसबुकवर म्हंटले अाहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी विकून झालेल्या विकासावर अाणि त्यातून निर्माण झालेल्या गुंडागर्दीवर मुळशी पॅटर्न सिनेमा तयार करण्यात अाला अाहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला अाहे. या सिनेमाच्या अारारा या गाण्यात स्थानिक गुंड नाचताना दिसत असल्याने वाद निर्माण झाला हाेता. अाज दुपारी अडीचच्या सुमारास तरडे यांच्या पाैड राेडवरील त्यांच्या कार्यालयात काही तरुणांनी गाेंधळ घातला. तसेच तरडे यांच्याशी त्यांनी धक्काबुक्की सुद्धा केली. याबाबत प्रविण तरडे यांनी अद्याप कुठलिही तक्रार पाेलिसात दाखल केलेली नाही. तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्याचे म्हंटले अाहे. ज्यांनी धक्काबुक्की केली ते तरुण माझ्याच गावचे असल्याचे तरडे यांनी म्हंटले अाहे. चित्रपट पाहिल्यानंर त्यांचा गैरसमज दूर हाेईल. सिनेमा हा शेतकऱ्यांवर असल्याचे तरडे यांनी म्हंटले अाहे.