- किरण शिंदे
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात पुरवण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात अनेकांना पुरविण्यात आलेली सिक्युरिटी काढून घेतली होती. त्यानंतर आता राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांनाच वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी पुरवण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली.
पार्थ अजित पवार (Parth Pawar) यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले होते. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले होते. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती.