लोणी काळभोर : तत्कलीन संचालक मंडळाने केलेल्या कथित गैरव्यवहारामुळे गेल्या सहा वर्षांपासून गाळपाविना बंद पडलेला थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. कराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा सूचना कारखाना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. गेली काही दिवस हा कारखाना जागा विकून सुल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसल्याने हा निर्णय घेतण्यात आल्याचे समजते. कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्यासाठी कारखान्यावरील १७२ कोटी कर्जाचा अर्थिक आराखडाही तयार करण्याचा सूचना सहकारमंत्र्यांनी कारखाना प्रशासनास दिल्या आहेत. विविध अडचणींमुळे आजारी व बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू व्हावेत म्हणून सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असलेल्या समितीची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, साखर संचालक किशोर तोष्णीवाल, प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे, यशवंतचे आवसायक अधिकारी बी. जे. देशमुख यांचसमवेत अधिकारी वर्ग उपस्थित होते.बैठकीमध्ये सहकारमंत्र्यांनी यशवंतची सध्याच्या अर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यांवेळी आमदार पाचर्णे यांनी कारखान्यावरील बँक व विविध वित्तीय संस्थाच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यांमध्ये त्यांनी कारखान्यावरील २७ कोटी रूपयांचा कर्जासाठी तब्बल ३०० कोटी रुपये किमतीची मिळकत राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेची बाब उपस्थितांच्या निदर्शनात आणून दिली. व यशवंतच्या स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री न करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कारखाना सुरू करण्याची विनंती सहकारमंत्र्यांना केली. यांनंतर बंद पडल्यानंतर गेली सहा वर्षे प्रशासनाने कारखान्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले यांबाबत चर्चा झाली.बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाध्यक्ष राजु शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे सहभागी झाले होते. यामध्ये यशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली. विशेष सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांनी भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार यशवंत चालू करण्याचा निर्णय झाला आहे. १७२ कोटी कर्जानुसार कारखान्याचा अर्थिक आराखडा भाडेतत्वावर चालू करण्यास तयार करून सर्व भाडेतत्वाची मुदत निश्चित करून निविदा काढण्याचा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.
सदर बैठकीत यशवंत भाडेतत्त्वावर चालू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. एकूण देणी व कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास दिल्यानंतर त्याची वसूली किती वर्षांनी होईल याबाबत यशवंतचा आर्थिक आराखडा तयार करून त्यानंतर साखर आयुक्तांची परवानगी घेऊन भाडेतत्वाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे.-बी. जे. देशमुख, आवसायक, यशवंत कारखाना