पुणे : कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा वर्धापन दिन आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने यंदाचा यशवंत वेणू पुरस्कार अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती यांना जाहीर झाला आहे. बुधवार २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते सायंकाळी ५:३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली
पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५,००० रूपये, मानपत्र पुणेरी पगडी शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महपौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते प्रशांत दामले, मराठी उद्योजक अमित गोखले, महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित राहणार आहे.
कोव्हिड केंद्रात विशेष कामगिरी करणाऱ्या माधुरी गायकवाड (परिचारिका), सागर निकम (सफाई कामगार), विलास अडागळे (बिगारी), धनंजय पुरकर यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.