शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

यवतला तीन दिवसांनी पाणी

By admin | Published: May 05, 2017 2:06 AM

यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा

यवत : यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेमधून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.दौंड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवत गावात मागील काही वर्षांत उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस गावातील लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायत व शासनाने शास्वत योजना केली नसल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.यंदा एप्रिल महिन्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती. आता मे महिना सुरु झाल्यानंतर यात आणखी भर पडली आहे. तीन दिवसांतून एकदा नळाला पाणी येत असल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे. गावातील बहुतांश खासगी बोअरवेलचे पाणी गेल्याने त्यांनाही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.नागरीवस्तीमध्ये पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक खासगी टँकरमधील पाणी विकत घेत आहेत. यामुळे गावातील खासगी टँकर असणाऱ्यांचे धंदे जोमात आले असले, तरी विकतच्या पाण्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे.यवतसाठी जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन माटोबा तलावाजवळ विहीर घेऊन पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र, सदर योजनेच्या विहिरीला आता पाणी कमी पडू लागल्याने केवळ चार तास मोटर चालते. अत्यंत कमी पाणी गावापर्यंत पोहोचत आहे. गावातील डॉ.अजितकुमार गांधी यांची बोअरवेल व यवत स्टेशन येथील बाहेती यांच्या विहिरीचे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी मिळाले आहे. मात्र, तरीही मिळणारे पाणी लोकसंख्येच्या मानाने अत्यंत कमी असल्याने गावात पाणीटंचाई जाणवत असल्याचे मत ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईमुळे महिलावर्गात तीव्र नाराजी खासगी टँकरसाठी ३०० रुपये देऊन विकत घ्यावे लागते पाणी. नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरु होऊन तेरा दिवस उलटले, तरी पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याने नागरिकांमध्ये वाढती नाराजी दिसत आहे.पुणे शहराच्या जवळ असल्याने यवतमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने गृहप्रकल्प होत आहेत. सद्यपरिस्थितीत गावात दीड हजार सदनिका आहेत, तर आणखी नवीन कामे सुरु होत आहेत. गावठाण, स्टेशन रोड परिसरात नागरीकीकरण वाढतच आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये हजारो नागरिक राहात असून झोपड्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत असल्याने शासनाने भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मोठी पाणीपुरवठा योजना यवतमध्ये राबविणे गरजेचे आहे.