यवत : दौंड तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर गावठी कट्टे बाळगण्याचा छंद आणि त्यातून वाढलेली गुन्हेगारी परत एकदा समोर आली आहे. मंगळवारी यवत पोलिसांनी चौफुला-सुपा रस्त्यावर कारवाई केलेल्या दोघांकडे आणखी दोन गावठी कट्टे व २० जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. मागील काही दिवसांमध्ये पोलिसांनी चार गुन्ह्यांमध्ये सहा गावठी कट्टे व अनेक जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सुरेश बापूराव खोमणे (वय ३५, रा. कोरहाळे, ता.बारामती), अमोल विलास खरात (वय २४, रा. दहिवडी , ता. मान , जिल्हा सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी (दि.२) रोजी रात्रीच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर व इतर पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना पडवी (ता.दौंड) गावच्या हद्दीत चौफुला सुपा रस्त्यावर सुपे घाटाच्या अलीकडे पाच जन दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. देवकर व त्यांचे पोलिस पथक पथकाने त्या ठिकाणी दोघांना पाठलाग करून अटक केली. तर अन्य तिघे दुचाकी वरून सुपा बाजूकडे भरधाव वेगाने पळून गेले. चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत पोलीस नाईक गणेश पोटे व विनोद रासकर किरकोळ रित्या जखमी झाले. त्यांनी दोघाना ताब्यात घेऊन अंगझडती केली. सुरेश खोमणे कडे एक गावठी कट्टा तसेच १० जिवंत काडतुसे आणि मोबाईल सापडला. तर अमोल खरात कडेही एक गावठी कट्टा, खिशात १० जिवंत काडतुसे व गाडीला एक बाजूस लाकडी दुस?्या बाजूस लोखंडी टॉमी व हँडलेंच्या बैगेत मिरची पावडर सापडली. सुरेश खोमणे हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा व मध्ये प्रदेश मध्ये विविध प्रकारचे १० पेलशा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गरदर्शनाखाली सहायक पुईस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस उप निरीक्षक राहुल यादव, पोलीस नाईक संदीप कदम, गणेश पोटे, अभिजित कांबळे, दीपक पालखे, सचिन होळकर, गणेश झरेकर, विनोद रासकर, विशाल गजरे, घनश्याम चव्हाण, संपत खबाले, परशुराम पिलाने यांच्या पथकाने केली.