शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

डॉक्टरांअभावी ‘वायसीएम’ आजारी

By admin | Published: April 01, 2016 3:25 AM

पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील हजारो रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्णालयासाठी वर्षाला ५५ कोटींची तरतूद आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील हजारो रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्णालयासाठी वर्षाला ५५ कोटींची तरतूद आहे. तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक यंत्रांमुळे अधिक उत्तम उपचार मिळू शकतात. मात्र, मनुष्यबळाच्या अभावी रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागते. शहरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिकेने १९८९ला संत तुकारामनगर येथे ‘वायसीएमएच’ रुग्णालयाची उभारणी केली. सध्या ७५० खाटा, तसेच अतिदक्षता विभागात २५ खाटा उपलब्ध आहेत. आठ शस्त्रक्रिया विभाग असून, दररोज शहरातील व शहराबाहेरील हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या रुग्णालयात केवळ शहर व परिसरातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतील रुग्णही उपचारासाठी दाखल होतात. या रुग्णालयात वर्षाला बाह्यरुग्ण विभागात सुमारे चार लाख रुग्ण, तर ४० हजार रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेतात. रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी असल्याने यंत्रणेवर अधिक ताण येत आहे. सध्या आस्थापनेवरील केवळ ३६ डॉक्टर कार्यरत आहेत. यासह १६२ परिचारिका आस्थापनेवरील असून, १२५ परिचारिका कंत्राटी पद्धतीवरील आहेत. डॉक्टर, परिचारिका, तपासणीस, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा प्रकारे महापालिका आस्थापना आणि ठेकेदारी पद्धतीचे मिळून सुमारे एक हजार कर्मचारी आहेत. मात्र, हे कर्मचारीही अपुरे पडत आहेत. रुग्ण दाखल होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे काही तासांतच एकाच डॉक्टरला ओपीडीमध्ये शेकडो रुग्ण तपासावे लागतात. अनेकदा अशी स्थिती निर्माण होते की, अवघ्या एक ते दोन मिनिटातच एका रुग्णाला तपासावे लागते. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दर वर्षी वायसीएमसाठी सुमारे ५५ कोटींची तरतूद असते. यामध्ये आस्थापना खर्चासह इतर बाबींसाठी खर्च केला जातो. मोठ्या वस्तूखरेदीसह औषधखरेदी वैद्यकीय विभागासाठीच्या एकूण बजेटमधून केली जाते. कोट्यवधींची तरतूद करण्यासह विविध प्रकारच्या तपासणींसाठी अत्याधुनिक यंत्र आहेत. तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध प्रकारच्या यंत्रांमुळे अधिक उत्तम उपचार मिळू शकतात. ‘आओ जाओ घर तुम्हारा’येथे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती दिसून आली. गेल्यानंतर सुरक्षारक्षकाने चौकशी केली. परंतु, आत आल्यानंतर इतरत्र भटकत असताना रुग्णालयातील कोणीही हटकलेदेखील नाही. कोणीही तिऱ्हाइत व्यक्ती रुग्णालयात कितीही वेळ बसून राहू शकते, तसेच कोणत्याही वॉर्डात फिरू शकते. स्वच्छतागृहांच्या शेजारील रिकाम्या जागेत कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. वायसीएममध्ये रुग्णांचे नातेवाईक रिकाम्या जागेतच बाटल्या, तसेच वैद्यकीय साहित्याचा कचरा फेकत आहेत. काही स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन व लहान मुलांचे डायपर पडलेले दिसून आले. प्रशस्त भागातच स्वच्छता आहे, मात्र तळमजला व आतील काही भागांत घाणीचे साम्राज्य आहे. त्या भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. नळांना असलेली गळती आणि त्यामुळे साठणारे पाणी यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. रिकाम्या भागात मद्याच्या बाटल्या आढळल्या.वार : गुरुवार, वेळ ९ वाजून ५५ मिनिटेवायसीएम रुग्णालयात प्रवेश द्वाराबाहेरच कडक सुरक्षा करण्यात आली होती. आत व बाहेर प्रवेशावरून अनेकदा वादविवाद रुग्णालयात होत होते. त्यामुळे सर्व रुग्णालयातील सर्व मार्गाचे सुरक्षारक्षकांमुळे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले आहे. नेहमीप्रमाणेच रुग्णांची गर्दी जास्त होती. वायसीएम रूग्णालयात प्रवेशद्वारासमोरच ठेवलेली तातडीने सेवा देणारी सारथी हेल्पलाइन मशिन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे. त्याचा वापर रुग्णांचे नातेवाईक सध्या इतर कारणांसाठी करीत आहेत. सारथी मशिनची माहिती बहुधा कित्येक नागरिकांना नाही. कित्येक दिवसांपासून मशिन धूळ खात पडले आहे. मशीनचा तांत्रिक बिघाड झाल्याने हेल्पलाइनचा रिसिव्हर उचलल्यानंतर ‘नो इमेल सपोर्ट’ अशी एरर त्या मशिनवर दाखवत आहे. व्हॉल्व्हमधून पाणीगळती राज्यातील बऱ्याच भागात दुष्काळ पडला असताना वायसीएममध्ये मात्र ठिकठिकाणच्या स्वच्छतागृहांच्या व इतर नळांमधून पाणी गळती होत आहे. नळांची देखभाल-दुरूस्ती कित्येक दिवसांपासून झाली नसावी, असे निदर्शनास आले आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील पाण्यांचे नळदेखील गळत आहेत. एकीकडे पाण्याची कमतरता असल्याची ओरड वारंवार वायसीएममध्ये केली जात आहे. तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.सुरक्षाव्यवस्था तैनातवायसीएमच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहने सुरळीतपणे बाहेर पडत आहेत. मुख्य गेट दुपारनंतर खुले केले जाते. तर इतर दरवाजेही योग्य वेळीच खुुले करण्याचे नियोजन केल्याने सुरक्षारक्षकही या नियोजनामुळे समाधानी आहेत. रुग्णालयाच्या काचेच्या खिडक्या व लोखंडी गजाची दुरवस्था झाली आहे. बहुतेक ठिकाणी तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत खिडक्या तुटलेल्या आहेत. चोरीची प्रकरणे वायसीएममध्ये कित्येक वेळा घडली आहेत. त्यामुळे खिडक्यांची दुरूस्ती गरजेची आहे.केसपेपरसाठी रांगावायसीएममधील महत्त्वाच्या व तातडीक सेवेसाठी लांबच लांब रांगा असतात. टोकन व केस पेपर काढण्यासाठीही प्रचंड गर्दी होती. बऱ्याच वेळा रुग्ण वा नातेवाईक ताटकळत उभा राहिले होते. मनुष्यबळाअभावी महत्त्वाच्या विभागांच्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वायसीएम रुग्णालयात ३२ नंबर विभागासमोर निवेदनाची सोय आहे. वायसीएमतील मुख्य वॉर्डामध्ये काही समस्या उद्भवल्यास निवेदन केले जात आहे. त्यामुळे अडचण सोडविण्यास सोपे जात आहे. भंगार अडगळीत पडून रुग्णालयाच्या तळमजल्यावर स्ट्रेचर, खुर्च्याचे भंगार अडगळीत पडून राहिले आहे. कित्येक दिवस अशा भंगाराच्या निविदा निघत नाहीत. भंगार कुुजून जाते. शेवटी त्या भंगाराचा काही उपयोग होत नाही. अशा महापालिकेच्या बहुतेक मालमत्तांकडे दुर्लक्ष होत आहे. लोकमत टीम : मंगेश पांडे, सुवर्णा नवले, किरण माळी, अतुल मारवाडी