उत्तमनगर, शिवणेमध्ये दरवर्षी बाबासाहेबांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासाने साजरी केली जाते. जयंतीच्या आदल्या दिवशी बुद्धविहारांमध्ये सर्वांना जेवण ठेवले जाते. वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. तसेच जयंतीच्या दिवशी शिवणे अहिरे गेट येथून उत्तमनगरपर्यंत मिरवणूक काढली जाते. परंतु मागच्या वर्षी आणि या वर्षी जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे जयंती साध्या पद्धतीने साजरी करणार असल्याचे विश्व नालंदा बुद्धविहाराचे अध्यक्ष भगवान गायकवाड म्हणाले. तसेच जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांना वंदना देऊन साध्या पद्धतीने आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करणार असल्याचे सांगण्यात आले.
विश्व नालंदा बुद्धविहार, उत्तमनगर,
भारतीय बौद्ध महासभा - ग्रामशाखा उत्तमनगर,
जागृती तरुण मंडळ,
भीमाई महिला मंडळ या सर्व मंडळांच्या वतीने
बुधवारी सकाळी ११ वाजता विहारात वंदना घेण्यात येईल. विहाराचे अध्यक्ष भगवान गायकवाड
सरचिटणीस संतोष शिवाजी माने, खजिनदार मनोज सुरेश बनसोडे, ज्येष्ठ सल्लागार सादबा गायकवाड, सुखदेव भिंगारदिवे, डी. के. सोनवणे, नागनाथ कांबळे, सुरेश बनसोडे, एकनाथ माने हे सर्व जण शासनाच्या नियमांचे पालन करत आणि सामाजिक अंतर राखत महामानव बाबासाहेबांना मानवंदना देतील.