शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उत्पन्न घटल्याने यंदा विकासकामांना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:45 AM

महापालिका : डिसेंबरपर्यंत २,४०० कोटी रुपयेच जमा

पुणे : बांधकाम व्यावसायातील मंदी व इतर अनेक कारणांमुळे यंदा महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठी घट येणाची शक्यता आहे. तब्बल ५ हजार ८७० कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज धरला असताना डिसेंबरपर्यंत कवेळ २,४०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामुळे यंदा शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी २०१७-१८च्या अंदाजपत्रक शाश्वत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थायी समितीला ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, स्थायी समितीने यामध्ये ४७३ कोटीं भर घातली. या वर्षी महापालिकेला डिसेंबरपर्यंत २,४०० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये मार्चअखेरपर्यंत आणखी १ हजार कोटींची भर पडली, तरी सुमारे २ हजार कोटींची तूट अंदाजपत्रकाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेला या वर्षी साडेतीन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा अंदाज खरा ठरल्यास महापालिकेला मागील वर्षीपेक्षा कमी उत्पन्न मिळेल. महापालिकेला या वर्षी मिळकर करातून ८७० कोटी, जीएसटी एलबीटी १,१६२ कोटी, पाणीपट्टी ६० कोटी, शासकीय अनुदान ४५ कोटी, बांधकाम ४०७ कोटी इतर जमा १२० कोटी, असे २,४०० कोटी रुपये महापालिका प्रशासनाला मिळाले आहेत. महापालिका प्रशासनाला या वर्षी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावा लागेल. त्याचे पैसे वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्मचारी वेतन, पेशन, देखभाल-दुरुस्ती, वाहन खर्च इत्यादींसाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येईल. त्यामुळे विकासकामांसाठी अत्यंत कमी निधी मिळणार आहे.महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मिळकतकर, एलबीटी, जीएसटी, बांधकाम विभाग हे आहेत. या वर्षी या सर्व विभागांना अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. बांधकाम विभाग आणि मिळकतकर यांचे उत्पन्न घटणार आहे. राज्य शासनाकडून एलबीटी आणि जीएसटीचे वाढीव उत्पन्न मिळात नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक वर्गीकरणे मुख्य खात्याच्या निधीतून करण्यात आली असल्यामुळे त्या वर्गीकरणांसाठी निधी उपलब्ध होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका