पुणे : एकीकडे देशातील बहुतांश भाग दुष्काळाशी तोंड देत असताना, तसेच उष्णतेचा कहर झेलत असताना दुसरीकडे पूर्व मोसमी पावसात तब्बल २५ टक्के घट झाली आहे़ मात्र रविवारी राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने सलामी दिली.मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीतील ओलावा कायम राहण्यास मदत होते़ मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण काही वर्षात सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे़ उष्णता वाढल्याने पाणी साठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे़
देशभरात १ मार्च ते ३१ मेपर्यंत एकूण सरासरी १३१़५ मिमी पाऊस पडतो़ यंदा तो ९९ मिमी पाऊस झाला आहे़ मान्सूनपूर्व पावसात तब्बल २५ टक्के घट झाली आहे़ दक्षिण भागात सर्वाधिक ४७ टक्के तुट आली असून उत्तरपश्चिम भारतात ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़ पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात १४ टक्के, मध्य भारतात १८ टक्के पाऊस कमी झाला आहे़ देशातील ३६ हवामान विभागापैकी तब्बल २३ हवामान विभागात कमी तसेच अत्यंत कमी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे़ केवळ एका विभागात सर्वाधिक जास्त तर ३ विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ९ विभागात सरासरी पाऊस झाला.याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले, राज्यात उन्हाळ्याच्या या दिवसात आकाशात कोणतेही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही़ उष्णतेमुळे अरबी समुद्राकडून बाष्प घेऊन येणारे ढग तयार झाले नाही़ त्यामुळे आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहचून उष्णता वाढण्यास कारणीभूत ठरली़ येथील माती काळीभोर असल्याने ती या उष्णतेमुळे पूर्णपणे सुकून गेली़ अशी सुकलेली माती अधिकाधिक उष्णता शोषून घेत असल्याने उष्णतेत वाढ झाली़ ढग तयार न झाल्याने त्याचा परिणाम होऊन मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़साताऱ्यात घरांत पाणीसातारा शहर व परिसराला रविवारी सायंकाळी पावसाने झोडपले. सुमारे एक तास मुसळधार पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले. काही ठिकाणी घरात तसेच इमारतीच्या तळघरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. कोरेगाव, खटाव व फलटण तालुक्यांतही पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टाआग्नेय अरबी समुद्र, लगतच्या लक्ष्यद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे़ त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पुढील चार दिवस कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़झाडे उन्मळलीउस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात रविवारी दुपारी वादळी वाºयासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असून झाडेही उन्मळून पडली आहेत. भूम शहरासह परिसरात दुपारी वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली.कोल्हापुरात हुलकावणीगेले तीन दिवस भल्या पहाटे वळवाने हजेरी लावली. पण रविवारी पुन्हा हुलकावणी दिल्याने दिवसभर कोल्हापूरकरांना घामाच्या धारांमध्ये चिंब होण्याची वेळ आली. दुपारनंतर ढग दाटून आले, वाराही सुटला, पण पाऊस बरसलाच नाही. सांगली जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते.चारही हवामान विभागात कमी पाऊस१ मार्च ते ३१ मेपर्यंतचा झालेला पाऊस (मिमी)विभाग झालेला सरासरी टक्केवारीपाऊस पाऊसकोकण ०़७ ३७़२ ९८मध्य महाराष्ट्र ८़३ ३७़८ ७८मराठवाडा ६़१ ३०़३ ८०विदर्भ ६़९ ३०़९ ७८