अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदव्युत्तर पर्यावरणशास्त्र संशोधन केंद्राच्या वतीने प्रा. डॉ. महेश शिंदीकर यांनी व त्यांचे स्वयंसेवक मुरली कुंभारकर, नागेश पवार, पद्मेश कुलकर्णी, शुभम पाटील, विनीत पवार, बालाजी नावंदे, शुभम अलटे यांनी सहभाग घेतला. प्रा. शिंदीकर हे गेल्या २० वर्षांपासून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी व रात्री ध्वनी प्रदूषणाची नोंद करतात. विसर्जन मार्गावरील १० चौकांत नेहमीप्रमाणे आवाजाची पातळी नोंदली असता या वर्षीची सरासरी केवळ ५९.८ डेसिबल आढळली.
लक्ष्मी रस्ता या मार्गावरील सरासरी नव्वदीच्या घरातून ५९ वर आली. गेल्या दोन दिवसांतील लक्ष्मी रस्त्यावरील (निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र) ध्वनी पातळी दिवसा ६७.१ आणि रात्री ४५.२ नोंदली गेली आहे. जी नियमानुसारच्या मर्यादेच्या आसपास आहे.
नियमानुसार निवासी भागात दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबल पातळी हवी. व्यावसायिक भागात दिवसा ६५ व रात्री ५५ चा नियम आहे.
-----------------------ध्वनी मोजणीची वैशिष्ट्ये
- लक्ष्मी रस्त्यावरील २४ तासांतील आणि १० चौकांत आढावा
- मिरवणुकीदरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे हे निरीक्षण नोंदविले
- ही मोजणी स्थलकालपरत्वे आणि शास्त्रीय पद्धतीने केली जाते
---------------------------
विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवसांतील नोंद
चौक १९ सप्टेंबर २० सप्टेंबर सरासरी
१) बेलबाग चौक ६० ते ६३ ४२ ते ६९ ५५.४
२) गणपती चौक ५८ ते ६८ ३६ ते ६८ ५५.१
३) लिंबराज चौक ६५ ते ६९ ४९ ते ७१ ६२.८
४) कुंटे चौक ६७ ते ७३ ३६ ते ६६ ५९.१
५) उंबऱ्या गणपती चौक ६८ ते ७१ ३५ ते ६६ ६१.४
६) भाऊसाहेब गोखले चौक ६३ ते ७० ३४ ते ६७ ५९.७
७) शेडगे विठोबा चौक ५९ ते ६५ ३२ ते ७० ५७.६
८) होळकर चौक ६४ ते ६९ ३३ ते ६८ ६०.८
९) टिळक चौक ६५ ते ६७ ३४ ते ६७ ६१.०
१०) खंडूजीबाबा चौक ६८ ते ७१ ३५ ते ७१ ६४.७
एकूण सरासरी ५९.८
-----------------------------गेल्या काही वर्षांतील ध्वनिप्रदूषण
२०१५ ९६.६
२०१६ ९२.६
२०१७ ९०.९
२०१८ ९०.४
२०१९ ८६.२
२०२० ६५.५
२०२१ ५९.८
-------------------------------