शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

यावर्षीही वारकऱ्यांचा मुक्काम अडचणीत, लोणी काळभोर पालखी तळ अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:14 AM

श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३३वा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी (९ जुलै) लोणी काळभोर येथे मुक्कामी येत आहे. येथील पालखी तळासाठी सहा वर्षांपूर्वी जागा आरक्षित करण्यात आली होती.

लोणी काळभोर - श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३३वा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी (९ जुलै) लोणी काळभोर येथे मुक्कामी येत आहे. येथील पालखी तळासाठी सहा वर्षांपूर्वी जागा आरक्षित करण्यात आली होती. यावर्षी प्रत्यक्ष कामासही सुरुवात झाली. २८ मेपर्यंत सर्व काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु बहुतांश काम अपूर्ण असल्याने यावर्षीही पालखीतळावर वारकºयांना मुक्काम करता येणार नाही हे नक्की झाले आहे.केवळ हवेलीतीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पालखीतळांपैकी सर्वात मोठा पालखीतळ लोणी काळभोर परिसरात विकसित होत आहे. प्रतिवर्षी वाढणारी वारकरी संख्या व त्यांच्या निवासाची योग्य सोय व्हावी याचा दूरगामी विचार करून सन २०१२मध्ये तत्कालिन उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल व हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के यांनी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या १५ एकर खानपड व गायरान जमिनीवर पालखीतळ म्हणून आरक्षण टाकले होते. त्या वेळी या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, पोहण्याचा तलाव, समाज मंदिर, मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन, मुलांना खेळण्यासाठी भव्य क्रीडांगण, व्यायामशाळा, शौचालयाची सुविधा, तसेच पक्ष्यांना आश्रय देण्यासाठी वड, पिंपळासारख्या मोठ्या झाडाचे वृक्षारोपण आदी बाबी करण्याचे नियोजित होते.सदर तळ वर्षातून फक्त दोन दिवस पालखीसाठी, तर उर्वरित ३६३ दिवस लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या स्थानिक नागरिकांना विविध सामाजिक, धार्मिक व इतर उपक्रमांसाठी अल्पदरात उपलब्ध करून द्यायचे त्यावेळी ठरले होते.२६ मे २०१२ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. येथील दगडखाणीच्या जागेवर सुमारे २0 फूट खोल व तेवढेच रुंद खड्डे होते. ते भरून काढणे म्हणजे दिव्य होते. तत्कालीन गावकामगार तलाठी गेणभाऊ शेवाळे यांनी विकसनाचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन लोकसहभागातून येथे दगड, माती व राडारोडा टाकून घेतला. तीन ठिकाणी घेण्यात आलेल्या विंधनविहिरींना मुबलक प्रमाणात पाणीही लागले होते. येथील सुमारे पन्नास टक्के जागा राहण्यायोग्य केली होती. १५ जून रोजी पालखी सोहळा लोणी काळभोरमध्ये आला त्या वेळी काही दिंड्यांनी या ठिकाणी प्रथमच मुक्कामही केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा पालखीतळ आपल्या गावात होत असल्याचा अभिमान येथील ग्रामस्थ बाळगून होते. १६ जून रोजी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला त्यानंतर सर्वांनीच या पालखीतळाकडे पाठ फिरवली.पालखी सोहळा लोणी काळभोरमध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे मुक्काम विठ्ठल मंदिरात असतो. येथे जागा प्रशस्त असल्याने कसलीही अडचण येत नाही. प्राथमिक शाळा, हायस्कूल, गावातील मंदिरे व गावठाणातील मोकळी मैदाने या ठिकाणी दिंड्या मुक्कामी असतात. पाऊस नसेल तर कसलीही अडचण येत नाही. परंतु पाऊस आला तर उघड्या मैदानात उतरलेल्या दिंड्यांच्या तंबूत पावसाचे पाणी जाते. त्यामुळे त्या दिंड्यातील वारकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पालखीतळ झाला तर या अडचणींपासून त्यांची सुटका होणार असल्याने तो लवकर व्हावा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.गेल्या सहा वर्षांत येथे कोणतेही काम झाले नसल्याने येथे राडारोड्याचे साम्राज्य आहे. उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल व हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के या दोघांचीही प्रशासकीय कारणावरून बदली झाली. त्यानंतर आलेल्या सर्वच शासकीय अधिकाºयांनी या पालखीतळाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. परंतु तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून दोन कोटी रुपये उपलब्ध झााल्याने पालखीतळाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. संंरक्षक भिंत व सभामंडपाची कॉलम उभारणी काम पुढे न सरकल्याने वारकºयांना इतरत्र मुक्काम करावा लागणार आहे.दोन महिन्यांत काम होणार पूर्णजागा ताब्यात न मिळाल्याने यावर्षी पालखी सोहळा येण्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही. उपलब्ध झालेल्या १ कोटी ५० लाख रुपये निधीतून चारही बाजूस संरक्षक भिंत, पालखीसाठी चार हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडप, त्यामध्ये विश्वस्तांसाठी दोन खोल्या, स्वयंपाकघर, अंघोळ व शौचालयाची सुविधा, पालखीतळावर वारकºयांसाठी चारही बाजूस पिण्याच्या पाण्याची सोय, दोन कमानी, ४ ठिकाणी पोलीस वॉच टॉवर, ६ ठिकाणी हायमास्ट दिवे टॉवर आणि अंतर्गत रस्ते करण्यात येणार आहेत. सदर सर्व कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहेत.- सचिन टिळक, शाखा अभियंता सार्वजनिकबांधकाम दक्षिण विभागजिल्ह्यातील सर्व पालखीतळांचा विकास शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. येथील पालखीतळाच्या जागेचे हस्तांतरण देहू संस्थानकडे वेळेवर झाले नाही. हस्तांतरण झाल्याने तळाच्या विकासाचे काम युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. तेथे वारकºयांच्या एकदिवसीय निवाºयासाठी वीज, पाणी, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था व इतर आवश्यक त्या सर्व सोईसुविधा करण्यात येणार आहेत.- सुनील दिगंबर मोरे, विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, सोहळा प्रमुख

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या