शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

पुण्यावर पाऊस मेहेरबान..! यंदा जुलैत १० वर्षातील सर्वाधिक बरसात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 12:32 PM

अजून पावसाचे दोन महिने बाकी असून या काळात राज्याबरोबरच पुण्यात पाऊस होण्याची शक्यता आहे़. 

ठळक मुद्देशहरात जुलैमध्ये ३७२़२ मिमी पाऊस

पुणे : यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी सातत्याने पाऊस कोसळत असल्याने जुलै महिन्यात पावसाने गेल्या १० वर्षातील सर्वाधिक पावसाची बरसात केली.  दीड महिन्यात चार महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा झाला आहे़. पुण्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ५६६ मिमी पाऊस होतो़. ३१ जुलै रोजी सकाळपर्यंत तब्बल ५७४. ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. यंदा मॉन्सूनचे शहरात जूनच्या अखेरच्या आठवड्यात झाले़.मात्र, त्यानंतर त्याने जवळपास दररोज हजेरी लावत आपला बॅकलॉग भरुन काढला़. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला़. पावसाचा पहिला बहर ओसरला की दरवर्षी जुलै महिन्यात खंड पडतो़. अनेकदा हा खंड १० ते १५ दिवसांपर्यंत असतो़. यंदा मात्र, एक दोन दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण जुलै महिन्यात नित्यनेमाने दररोज पाऊस हजेरी लावून जात होता़. कधी तो जोरदार बरसत होता़ तर कधी हलकीशी चाहूल देऊन जात होता़. यामुळे यंदा जून अखेरीस पडलेला धुवांधार पाऊस व त्यानंतर सातत्याने होत असलेली बरसात यामुळे चार महिन्याच्या पावसाची सरासरी जुलै अखेरीत ओलांडली़. जुलै अखेर सरासरीपेक्षा तब्बल २५३ मिमी जादा पाऊस नोंदविण्यात आला आहे़. गेल्या दहा वर्षात जुलै महिन्यात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे़. गेल्या शंभर वर्षात पुण्यात जुलै १९०७ मध्ये सर्वाधिक ५८५ मिमी पावसाची नोंद झाली होती़ गेल्या १० वर्षात २०१४ मध्ये २८२. ४ मिमी पाऊस झाला होता़ तर २०१५ मध्ये सर्वात कमी ६२ मिमी पावसाची नोंद झाली होती़.पुढील सहा दिवस शहरातल हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. अजून पावसाचे दोन महिने बाकी असून या काळात राज्याबरोबरच पुण्यात पाऊस होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे यंदा पुणेकरांसाठी मॉन्सून चांगला जाणार असल्याचे दिसून येत आहे़. ़़़़़़़़़़़ 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणWaterपाणीMonsoon Specialमानसून स्पेशल