पुणे: दस-याला मागणी असणा-या झेंडूच्या फुलांना गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांनी कमी भाव मिळाला आहे.चांगल्या दर्जाच्या झेंडूच्या फुलांना एका किलोला ४० ते ५० रुपये तर कमी दर्जाच्या फुलांना १० ते २० रुपये दर मिळाला.दस-याला झेंडूचे भाव खाली आले असले तरी दिवाळीला झेंडूला चांगला भाव मिळेल,अशी शक्यता गुलटेकडी येथील फुल बाजारातील व्यापा-यांनी व्यक्त केली.दस-या निमित्ताने झेंडूच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे दुचाकी,चार चाकी वाहनांना फुलांच्या माळा घातल्या जातात. तसेच पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे दस-याला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दसरा दोन दिवसांवर येवून ठेपल्याने मंगळवारी मार्केट यार्डातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची तब्बल ७३ हजार ९८६ किलो आवक झाली. मागणीच्या तुलनेत झेंडूची आवक झाल्याने फुलांना ४० ते ५० रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी झेंडूला ८० ते १०० रुपये दर मिळाला होता.त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत झेंडूचे दर ५० टक्क्यांनी खाली आले आहेत.मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले,दस-याला मोठ्या आकाराच्या झेंडूला अधिक मागणी असते.मात्र,काही ग्राहकांकडून कलकत्ता, अष्टगंधा आदी प्रकारच्या झेंडूला पसंती दिली जात आहे. झेडू बरोबरच शेवंतीच्या फुलांचीही खरेदी ग्राहकांकडून केली जाते.शेवंतीला ५० ते १०० रुपये तर गुलछडीला १२० ते २०० रुपये भाव मिळाला. झेडूची आवक आणि मागणी सारखीच असल्याने झेडूचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.गणपती उत्सवाच्या तुलनेत दस-या झेंडूला चांगला भाव मिळत आहे.गणपतीमध्ये झेडूचे दर खूपच खाली उतरले होते.यंदा झेंडूची लागवड जास्त झाल्याने आवकही चांगली आहे.मात्र,दिवाळीनंतर झेंडूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.------------------ कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रसिध्द करण्यात आलेले फुलांचे दर फुलाचे नाव आवक दर शेवंती पांढरी १५,७६७ ४० ते ६० (किलो)शेवंती पिवळी १९,१०४ १० ते २० (किलो)गुलाब ८,५१२ २० ते ३० (गड्डी)डच गुलाब ४,७४९ ३० ते ५० (गड्डी)