शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 3:49 PM

श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी

ठळक मुद्दे शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.

देहूगाव: शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे. यावेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरया आणि विश्वस्त उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.  

बायोबबल म्हणजे काय? 

जैव सुरक्षित वातावरण ( बायोबबल ) यामध्ये संबंधित व्यक्तींना आरोग्याचा अहवाल रोज सादर करावा लागतो. समाज, परिसर आणि नागरिकांपासून त्यांना १,२ किलोमीटर वेगळे ठेवले जाते. बायोबबलमध्ये त्यांना कोणीही व्यक्ती भेटू शकत नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाते.  

पालखी सोहळ्यात कसा असेल बायोबबल? 

पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांने आरटीपीसीआर कोवीड तपासणी केल्याचा अहवाल संस्थानकडे सादर करावा. सदर वारकरीची वयोमर्यादा व शारिरीक क्षमता शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे राहिल. वारीमधील सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी संस्थानने नेमून दिलेल्या ठिकाणीच मुक्काम करावा. सोहळा सोडून इतरत्र बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येवू नये तसेच त्यांच्या कोणत्याही वस्तूंचा स्विकार करू नये. पालखी मुक्कामाची ठिकाणे गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत किंवा शाळा महाविल्यालये असेल. ही ठिकाणी मुक्कामापुर्वी व नंतर सॅनिटाईझ केली जावीत. प्रत्येक वारकऱ्याची दर तीन दिवसांनी कोवीड टेस्ट केली जाईल.

भोजनाची व राहण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात येईल. सहभागी वारकऱ्यांनी सॅनिटाईझरचा वापर करावा, मास्क लावणे बंधनकारक असून वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू परतीचा प्रवास बंधनकारक असेल. सोहळ्यात सहभागी होण्याअगोदर व नंतरही ७ दिवस विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक आहे. पालखी सोहळा कार्यक्रमामध्ये पालखी सोहळा प्रमुखांनी व शासनाच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करावे लागेल. अशा प्रकारचे जैव सुरक्षा कवच पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.. 

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpurपंढरपूरAjit Pawarअजित पवार